शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाळूशिल्पांनी किनारा सजणार

By admin | Updated: April 26, 2017 23:55 IST

पर्यटकांना खास आकर्षण : पर्यटन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात २८ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या दोन्ही पर्यटन महोत्सवांची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मांडवी समुद्र किनाऱ्यावर होणाऱ्या पर्यटन महोत्सवासाठी मांडवी समुद्र किनाऱ्यावर विविध प्रकारची वाळूशिल्प बनविण्याचे काम जोरात आहे. वाळूशिल्प बनविण्याची चाचणी घेतली जात असून, त्यात अनेकजण सहभागी होत आहेत. मांडवी महोत्सवात साकारली जाणारी वाळूशिल्प पर्यटक व रत्नागिरीकरांसाठी आकर्षण ठरणार आहेत. शहरातील मांडवी बंदर हे रत्नागिरीचे गेटवे म्हणून प्रसिध्द आहे. या ठिकाणी थेट समुद्रात पाचशे मीटर लांबपर्यंत उभारलेल्या जेटीवर जाऊन समुद्राच्या अथांगतेचा, जेटीला धडका मारणाऱ्या लाटांचा थरार अनुभवता येतो. या जेटीच्या सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन महोत्सवाच्या काळात होणार आहे. मांडवीला क वर्ग पर्यटन केंद्र म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. मात्र, या पर्यटन केंद्राला ब दर्जा मिळावा, ही येथील जनतेची मागणी आहे. त्यासाठीच येथे पर्यटनाच्या सुविधा कायमस्वरुपी उभारण्यात येणार असून, त्यात स्थानिक व मांडवी पर्यटन संस्थेने पुढाकार घेतला आहे. हा महोत्सव हा पर्यटन वाढीसाठी वातावरण निर्मिती करणार आहे. (प्रतिनिधी)मासेमारीचा थरारपर्यटकांसाठी मांडवी येथे मासेमारी कशाप्रकारे केली जाते याचे प्रात्यक्षिकही दाखविले जाणार आहे. त्यामुळे या होड्या, लॉँचेसमधून प्रत्यक्ष मासेमारी करण्याचा थरारक अनुभवही अनेक पर्यटकांना घेता येणार आहे. त्याबाबतची तयारीही आयोजकांनी पूर्ण केली आहे. लॉँचने समुद्रात जाऊन जाळी टाकून मासे कसे पकडले जातात याचे हे प्रात्यक्षिक असणार आहे.आम्ही रापणकर...पारंपरिक मच्छीमारीचा अत्यंत आकर्षक व वेड लावणारा प्रकार म्हणचे रापण हा मासेमारी प्रकार. या प्रकाराची पर्यटकांनाही फारशी माहिती नाही. ही माहिती व्हावी म्हणून खास कार्यक्रमही येथे होणार आहे. रापणीचा शेवटचा जाळ्याचा भाग किनाऱ्यावर आल्यानंतर कमी पाण्यात जाळ्यामध्ये फडफडणारे जीवंत मासे पाहणे ही पर्वणीच ठरणार आहे.