शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उपसा करणारे तराफे पेटविले

By admin | Updated: March 15, 2015 00:44 IST

कूर परिसरातील घटना : भुदरगड तहसील विभागाची कारवाई

गारगोटी : कूर-मडिलगे दरम्यान वेदगंगा नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांची १७ तराफे भुदरगड तहसील विभागाने शनिवारी पेटवून दिली. मात्र, वाळू तस्करी करणारा एकही तस्कर किंवा वाहन तहसील विभागाच्या हाती लागले नाही. कूर येथे १६, तर वाघापूर येथे एक तराफा पेटविण्यात आला. तालुक्यातील कूर, वाघापूर, कोनवडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून वेदगंगा नदीपात्रातून दररोज शेकडो ब्रास वाळूचा राजरोजसपणे उपसा सुरू आहे. या वाळू तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत यांनी तक्रारी केल्या. मात्र, हे तस्करी करणारे थांबले नाहीत. यापूर्वी तहसील विभागानेही एकवेळ कारवाई केली होती. पण, याचा कोणताही परिणाम या वाळू तस्करांवर झाला नाही. नदीपात्रात पाणी असतानासुद्धा लाकडी तराफ्यांना ट््युब बसवून दिवसरात्र वाळू उपसा सुरू होता. त्यामुळे अनेक तक्रारी ग्रामस्थ ग्रामपंचायत व तहसील विभागाकडे करीत होते. या तक्रारींची दखल घेत शनिवारी दुपारी तहसीलदार शिल्पा ओसवाल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली. मात्र, पथक नदीवर पोहोचण्यापूर्वीच वाळू तस्करांनी धूम ठोकली. त्यामुळे या पथकाने वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे तराफे पेटवून दिली. पेटवून दिलेल्या तराफ्यांची एकत्रित किंमत सुमारे एक लाखापेक्षा अधिक आहे. कारवाईत तहसीलदार शिल्पा ओसवाल, नायब तहसीलदार व्ही. एन. बुट्टे, सर्कल बी. डी. बुजरे, डी. बी. टिपुगडे, पी. डी. झंजे, श्रीकांत भोसले, श्रीनिवास जाधव, व्ही. एन. पाटील यांनी सहभाग घेतला. दिवसा वाळू उपसा; रात्री तर्र... वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये १८ ते २३ वर्ष वयोगटांतील तरुणांचा समावेश आहे. दिवसभर वाळू उपसा करून रात्री दारूच्या नशेत तर्र... झालेले हे तरुण पाहायला मिळतात. या तरुणांच्या घरातील पालकांच्याही वाळू उपसा करण्याबद्दल तक्रारी आहेत; पण सायंकाळी दारूच्या नशेसाठी हे तरुण पालकांच्या तक्रारींकडेही दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तहसील विभागाने पुन्हा वाळू तस्करी होऊ नये यासाठी दक्ष राहण्याची गरज असल्याचे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)