शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करांकडून मंडल अधिकाऱ्यांना मारहाण

By admin | Updated: January 2, 2015 00:58 IST

इंगळीत जमावाकडून प्रकार : तलाठी कार्यालयाची मोडतोड; तलाठ्यांनाही चोप

हुपरी : रॉयल्टी न भरता वाळू वाहतूक करणारा ट्रक अडविल्याच्या कारणावरून इंगळी (ता. हातकणंगले) येथील संतप्त ग्रामस्थांनी रुई सज्जाचे मंडल अधिकारी सतीश शिंदे व पट्टणकोडोलीचे गावकामगार तलाठी गजानन माळी यांना बेदम मारहाण केली. संतप्त जमावाने तलाठी कार्यालयाची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली. दरम्यान, याप्रकरणी अवैध वाळू वाहतूक करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, कार्यालयाची मोडतोड करून अधिकाऱ्यांना मारहाण करणे, अशा प्रकारचे गुन्हे ट्रकचालक सागर मधुकर घोरपडे (रा. नृसिंहवाडी) याच्यासह अकराजणांविरोधात दाखल करण्यात आले आहेत.त्यामध्ये कुबेर चौगुले, अमर चौगुले, पोपट चौगुले, श्रीमंधर चौगुले, नागेश मगदूम, देवगोंडा मगदूम, गणेश मगदूम, सुनील चौगुले, अमित चौगुले, समीर चौगुले यांचा समावेश आहे. याप्रकरणी मंडल अधिकारी सतीश शिंदे यांनी हुपरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.पोलिसांतून समजलेली माहिती अशी, इंगळी येथे महादेव मंदिराचे बांधकाम सुरू आहे. यासाठी लागणारी वाळू अवैधरीत्या ट्रकमधून आणण्यात येत होती. आज, गुरुवारी दुपारी हा ट्रक मंडल अधिकारी शिंदे व तलाठी गजानन माळी यांनी अडवला. यावेळी वाळू वाहतुकीचा परवाना, वाळूची रॉयल्टी भरल्याची कागदपत्रे तपासण्यासाठी मागितली असता ट्रकचालक सागर घोरपडे याने दिली नाहीत. त्यामुळे ट्रक जप्त केला. याबाबत पंचनामा करण्याचे काम सुरू असताना वादावादी झाली. परिणामी, संतप्त जमावाने या दोघांना मारहाण करीत तलाठी कार्यालयावर हल्ला केला व कार्यालयातील साहित्यांची मोडतोड केली. (प्रतिनिधी)अकराजणांवर गुन्हे दाखलया घटनेची माहिती तहसीलदार दीपक शिंदे यांना समजताच ते घटनास्थळी आले. त्यांनी या प्रकाराची माहिती घेतली व दोषींवर कारवाई करण्याबाबत हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार अकराजणांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले.