सावरवाडी : ग्रामीण जनतेला आरोग्य सुविधा मिळावी यासाठी कोगे (ता. करवीर) गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रास शासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.
सन २०१९ च्या जनगणनेनुसार आरोग्य बृहत आराखड्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात २५२ आरोग्य केंद्रांची स्थान निश्चित करण्यात आली आहे. १२० प्राथमिक आरोग्य केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. १३२ आरोग्य केंद्रात तांत्रिक जागेअभावीच्या त्रुटी आहेत.
कोगे गावातील गट क्रमांक ७३९ मधील ८० गुंठे जागेमध्ये चार कोटी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यास शासकीय मंजुरी मिळाल्याचे पत्र अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी दिले आहे . प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरीसाठी पालकमंत्री सतेज पाटील, करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचे सहकार्य लाभले असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.
१८ कोगे आरोग्य केंद्र मंजुरी
फोटो ओळ = कोगे ( ता. करवीर ) गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरीचे पत्र अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी काॅंग्रेस नेते राजेंद्र सूर्यवंशी यांना दिले .