शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात ‘सनातन’ साधकांची झाडाझडती

By admin | Updated: June 16, 2016 01:02 IST

वीरेंद्रसिंग तावडेकडूनच देसाई यांना धमकीची शक्यता

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्या व डॉ. देसाई धमकीप्रकरणी ‘सीबीआय’ व ‘एसआयटी’ला डॉ. वीरेंद्रसिंग तावडेकडून महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याने कोल्हापूर पोलिसांनी डॉ. तावडेच्या संपर्कात असलेल्या कोल्हापुरातील काही ‘सनातन’ साधकांची झाडाझडती सुरू केली आहे. येथील ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना आलेल्या निनावी धमकी पत्रासंबंधी डॉ. तावडे याच्याकडे ‘सीबीआय’ व ‘एसआयटी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. यावेळी डॉ. तावडेकडे मिळालेल्या हार्डडिस्कमध्ये पुरोगामी विचारांच्या व्यक्तींच्या यादीमध्ये डॉ. देसाई यांच्या नावाचाही उल्लेख असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. पानसरे हत्येचा मास्टर मार्इंड डॉ. तावडेच असल्याचे ‘सीबीआय’च्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी डॉ. तावडेचा ताबा मिळविण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. ‘सीबीआय’ने तावडेच्या घरावर छापे टाकल्यानंतर डॉ. देसाई यांनी दि. १८ एप्रिल व ३ जूनला पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची भेट घेऊन दिलेल्या अर्जामध्ये डॉ. तावडेची चौकशी करण्याची मागणी केली होती. तक्रार अर्जामध्ये सहा वर्षांपूर्वी डॉ. वीरेंद्रसिंग तावडे हा अभय वर्तक यांच्यासह गोवा व फोंड्याच्या काही व्यक्तींसोबत कार्यालयात आला. त्याने तुम्ही धर्म आणि तत्त्वज्ञानातील डॉक्टरेट आहात. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे सचिव असल्याने आमच्यासाठी तुम्ही एक महत्त्वाची व्यक्ती आहात. त्यांनी आपणास ‘सनातन प्रभात’ दैनिकाचे संपादक होण्याची विनंती केली; परंतु काही दिवसांनी मी त्यांना नकार कळविला. त्याची नाराजी त्यांच्या मनात असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनेही तपास व्हावा, असा उल्लेख केला होता. गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास सीबीआय एसआयटी व सीआयडी (कर्नाटक) या तिन्ही तपास यंत्रणांद्वारे सुरू आहे. ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्यांनी डॉ. तावडेच्या घरी व आश्रमावर छापा टाकला असता त्याकडे मिळून आलेल्या हार्डडिस्कमध्ये अनेक पुरोगामी विचारांच्या व्यक्तींची यादी मिळाली. यासंबंधी ‘एसआयटी’च्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी ‘सीबीआय’ने तावडेकडे चौकशी केली आहे. कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात डॉ. तावडे आल्यानंतर आणखी काही महत्त्वाचे पुरावे हाती लागणार असल्याचे सांगितले. तावडेचा डॉ. दाभोलकरांशी वाद कोल्हापुरात सहा वर्षांपूर्वी दसरा चौकातील शाहू स्मारक येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम होता. डॉ. दाभोलकर यांनी व्याख्यान संपल्यानंतर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, असे बोलताच समोर प्रेक्षक गॅलरीत बसलेला डॉ. वीरेंद्रसिंग तावडे उठून तुम्ही जे काही सांगत आहात ते चुकीचे आहे, असा आरोप करत डॉ. दाभोलकरांशी वाद घातला. ही आठवण ‘अंनिस’चे कार्यकर्ते सतीशचंद्र कांबळे यांनी पत्रकारांना सांगितली. न्यायालयीन कोठडी मिळताच ताबा पुणे न्यायालयाने डॉ. तावडेचा ताबा घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांना मंजुरी दिली आहे. ‘सीबीआय’ने तावडेला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळताच कोल्हापूर पोलिस त्याचा ताबा घेणार आहेत. त्यासाठी बुधवारी दुपारीच विशेष पथक पुण्याला रवाना झाले. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंग तावडे याच्याकडे मिळून आलेल्या हार्डडिस्कमध्ये पुरोगामी विचारांच्या व्यक्तींची नावे मिळून आली आहेत. पोलिसांनी संबंधित व्यक्तींना सर्तक करून त्यांच्या सुरक्षेची योग्य ती दक्षता घ्यावी. डॉ. सुभाष देसाई,ज्येष्ठ पत्रकार