शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

थकबाकीदारांच्या दारात ‘सनई-चौघडा’

By admin | Updated: January 8, 2016 00:27 IST

जिल्हा बँकेचे वसुली अभियान : सोमवारी ‘गांधीगिरी’ पद्धतीचा अवलंब

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चार बडे थकबाकीदार असलेल्या तंबाखू संघाचे संजय पाटील, उदयसिंहराव गायकवाड साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, इंदिरा महिला साखर कारखान्याच्या अध्यक्षा विजयामाला देसाई व कोल्हापूर बिजोत्पादक संघाचे अध्यक्ष वसंतराव पाटील-कौलवकर यांच्या दारात सोमवारी ‘सनई-चौघडा’ लावून गांधीगिरी पद्धतीने कर्जवसुली आंदोलन करणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. या कर्जदारांना शनिवारपर्यंत (ता. ९) कर्ज भरण्याची मुदत दिली आहे, तोपर्यंत त्यांनी ही रक्कम न भरल्यास पहिल्यांदा सोमवारी (दि. ११) बँकेचे कर्मचारी या चौघांच्या दारात जाऊन सनई चौैघडा वाजवत बसतील. त्यानंतर सर्व संचालक मंडळही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. बँकेने कर्ज वसुलीसाठी कसोशीने प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. त्याचा भाग म्हणून एक कोटीहून जास्त कर्ज थकीत असलेल्या ५० बड्या थकबाकीदारांची यादी आम्ही काढली आहे. त्यातील सर्वांत चार बडे थकबाकीदार जे आहेत त्यांच्याकडेच बँकेचे १०१ कोटी रुपये अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या दारांत पहिल्यांदा जाऊन बसायचे, असे आम्ही ठरविले आहे. हे कर्ज संस्थेसाठी घेतले असले तरी ते घेताना संस्थाचालक म्हणून जे लोक पुढे होते, त्यांच्या घराच्या दारात जाऊन कर्मचारी, अधिकारी आंदोलन करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.कर्जाची थकबाकी अशी..विजयमाला देसाई ऊस तोडणी संस्था :९ कोटी ४० लाखअ) उदयसिंगराव गायकवाड ऊस तोडणी वाहतूक संस्था : २७ कोटी ५१ लाखब) उदयसिंगराव गायकवाड कारखाना तात्पुरते कर्ज ०१ : ११ कोटी १७ लाखक) उदयसिंगराव गायकवाड कारखाना तात्पुरते कर्ज ०२ : २ कोटी ९९ लाखड) उदयसिंगराव गायकवाड कारखाना तात्पुरते कर्ज ०३ : ४ कोटी४६ लाख४अ) कोल्हापूर जिल्हा बिजोत्पादक संघ :१ कोटी २७ लाखब) भोगावती कुक्कुटपालन संस्था, परिते :५ कोटी ३० लाखशेतकरी सहकारी तंबाखू संघ उद्योग समूह१) तंबाखू खरेदी-विक्री संघ : २४ कोटी २) शेतीमाल प्रक्रिया संघ : ५ कोटी ४९ लाख३) महाराष्ट्र स्टेट टोबॅको फेडरेशन :३ कोटी ७१ लाख४) मयूर वाहतूक संस्था : २ कोटी २० लाख५) एस. के. पाटील बँक, कुरुंदवाड :२ कोटी ७८ लाख६) तंबाखू संघ समूह नोकर सोसायटी :५६ कोटी ९७ लाखएकूण थकबाकी : १०० कोटी ९३ लाख