शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

समरजित घाटगे पुणे म्हाडाचे अध्यक्ष

By admin | Updated: April 10, 2017 14:44 IST

अधिकृत घोषणा : पालकमंत्र्यांनी शब्द खरा केला

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : कागलच्या शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते समरजित विक्रमसिंह घाटगे यांची सोमवारी शासनाने पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अध्यक्षपदी तीन वर्षासाठी रितसर नियुक्ती केली. गृहनिर्माण विभागाने त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. महसूल मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घाटगे यांना हे पद देण्याचे जाहीर केले होते. आता समरजित हे कागल विधानसभेचे संभाव्य उमेदवारही असू शकतात.दिवंगत विक्रमसिंह घाटगे हे १९७८ ते ८५ च्या काळात काँग्रेसचे आमदार होते. त्यानंतर या गटाकडे तालुक्यात महत्वाचे सत्तेचे पद नव्हते. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात कुणाला तरी पाठिंबा देत या गटाची वाटचाल सुरु राहिली. परंतू समरजित यांनी भाजपमध्ये प्रवेश करून नगरपालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर भाजपच्या चिन्हांवर लढवली आणि गटाची पुर्नबांधणी केली. तालुकाभर दौरे काढून त्यांनी पक्ष संघटन मजबूत केले. दोन्ही निवडणूकीत त्यांना गुलाल मिळाला नसला तरी किमान चाळीस हजार मतांचा गठ्ठा या गटाकडे आहे हे त्यांनी दाखवून दिले. राजकीय दृष्ट्या पूर्वीचा कोणत्याही पक्षाचा शिक्का त्यांच्यावर नाही. तरुण वय, स्वच्छ प्रतिमा आणि विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व म्हणून त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. आता ही सत्तेची संधी मिळाल्याने घाटगे गटाला उभारी मिळाली. कागल विधानसभेचे भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणूनही त्यांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.कागल तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, शिवसेनेचे संजय मंडलिक व संजय घाटगे अशी राजकीय वाटणी आहे. तिथे भाजपला झेंडा हातात घ्यायलाच कुणी नव्हते. ते हेरून पालकमंत्री पाटील यांनीच शब्द देवून समरजित यांना भाजपमध्ये घेतले. आॅक्टोबरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हाच दानवे यांनी म्हाडाचे अध्यक्षपद देण्याचे जाहीर केले होते. कागल नगरपालिका निवडणूकीत पालकमंत्री पाटील यांनी मुश्रीफ यांनी समरजित यांच्या लालदिव्याची चिंता करू नये तो आम्ही त्यांना देणार आहेच असे जाहीर केले होते. परंतू नगरपालिका,जिल्हा परिषद निवडणूका व अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे ही नियुक्ती लांबली होती. त्यावर अखेर सोमवारी शिक्कामोर्तब झाले आणि कागल तालुक्यात घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याबध्दल जोरदार आनंद व्यक्त केला.राज्यमंत्री पदाचा दर्जाकाँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अंकूश काकडे हे या मंडळाचे सहा वर्षे अध्यक्ष होते. कोल्हापूरसह सांगली,सातारा,पुणे आणि सोलापूर हे या मंडळाचे कार्यक्षेत्र आहे. मंडळाचे मुख्यालय पुण्यात असून कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी प्रामुख्याने गृहनिर्माण योजना या मंडळातर्फे राबविल्या जातात. मंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दाखविलेल्या विश्वासास नक्की पात्र राहू. हे पद मिळाल्याने आमच्या गटाला उभारी आली असून कार्यकर्त्यांनाही आनंद झाला आहे.समरजित घाटगेअध्यक्ष, पुणे विभागीय म्हाडा मंडळ