शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारात समरजित यांची आघाडी

By admin | Updated: February 17, 2017 01:04 IST

४० हून अधिक बैठका : नवोदिता घाटगेंनीही कागल पिंजून काढले

कोल्हापूर : भाजपसह सर्वच राजकीय पक्षांच्या तुलनेत कागल तालुक्यात ‘शाहू’ साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी प्रचारसभा व गटांच्या बैठकी घेण्यात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आतापर्यंत त्यांनी ४० हून अधिक सभा व त्यापेक्षा दुप्पट गटांच्या बैठका घेऊन जोरदार वातावरण निर्मिती केली आहे. त्यांच्यासमवेत नवोदिता घाटगे यांनीही तालुका पिंजून काढत थेट महिला वर्गाशी संपर्क साधल्याने कागलचे राजकारण ढवळून निघाले आहे. कागल तालुक्यात आतापर्यंत घाटगे गटाने अनेक निवडणुका लढविल्या. स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे हे सक्रिय राजकारणात होते, त्यावेळी राजकारणाचा रंग काहीसा वेगळा होता. दोन गटांतच निवडणूक होत असल्याने फारशी ताणाताण करावी लागत नव्हती; पण सध्याच्या राजकारणात विकासकामांबरोबर संपर्कालाही महत्त्व आल्याने निवडणुकांची शैलीही बदलली आहे. प्रत्येक राजकीय पक्षात कोणतीही निवडणूक असू दे, उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत असतो. तो मिटविण्यात नेत्यांची निम्मी ताकद खर्च होते. त्यानंतर सभा, बैठका सुरू होतात. पण, समरजितसिंह घाटगे यांनी १४ डिसेंबरपासून सभा व बैठकांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेसाठी वातावरण निर्मितीस सुरुवात केली आहे. दोन-तीन गावांचा एक मोठा मेळावा घेत आपली भूमिका व विकासाचे व्हिजन लोकांना समजावून सांगण्यावर त्यांनी भर दिला. पहिल्या टप्प्यात त्यांनी जिल्हा परिषदेच्या मतदारसंघनिहाय इच्छुकांचा अंदाज घेत सक्षम उमेदवारांचा शोध घेतला. त्यानंतर १७ जानेवारी ते १२ फेबु्रवारी या कालावधीत त्यांनी दुसऱ्या टप्प्यात त्यांनी सभांचा धडाकाच लावला. त्यांच्यासमवेत नवोदिता घाटगे यांनी दुसऱ्या बाजूने हळदी-कुंकू कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांशी संपर्क वाढविला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह इतर पक्षांनी गेले तीन महिने प्रचार यंत्रणा राबविलेली दिसत नाही. आतापर्यंत ४० हून अधिक सभा घेऊन प्रत्येक मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला आहे. कागल तालुक्यासारखी राजकीय ईर्षा कोठेही पाहावयास मिळत नाही, हे जरी खरे असले तरी नेत्यांची राबणूक व व्हिजन हेही तिथेच पाहावयास मिळते. (प्रतिनिधी)टीकाटिप्पणीला फाटा...जसजशी निवडणूक जवळ येईल, तशी टोकाची टीका सुरू होते; पण समरजितसिंह यांनी टीकाटिप्पणीला फाटा देत भाजप सरकारची ध्येयधोरणे व विकास यांवरच आपल्या भाषणात भर दिल्याचे दिसते.रोज चौदा तास मतदारसंघात!समरजितसिंह घाटगे यांचा सकाळी आठ वाजल्यापासून मतदारसंघातील दौरा सुरू होतो. सकाळच्या टप्प्यात तीन-चार गावांत जाऊन बैठका, कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाते. एखाद्या गावातच दुपारचे जेवण करून पुन्हा बैठकांचा धडाका सुरू होऊन रात्री दहापर्यंत ते मतदारसंघातच असतात.