शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

समीरला कोल्हापुरात फिरविले

By admin | Updated: September 21, 2015 23:56 IST

वकिलांनी घेतली भेट : तपासात कमालीची गोपनीयता

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित समीर गायकवाड याला कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी दुपारी गोपनीयरीत्या कोल्हापूर शहरात काही ठिकाणी फिरविले. दरम्यान, न्यायालयाच्या परवानगीनुसार हिंदुत्ववादी संघटनेचे वकील अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अ‍ॅड. प्रीती पाटील यांनी समीर गायकवाड याची भेट घेऊन त्याच्याशी सुमारे १५ मिनिटे चर्चा केली शिवाय बंगलोर येथील सीआयडीचे अधिकारी राजशेखर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांची भेट घेऊन धारवाड येथील एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत गायकवाड याचे काही कनेक्शन आहे का? याबाबत चर्चा केली. कॉ. पानसरे यांच्या हत्येसंदर्भात कोल्हापूर पोलिसांनी तपासाबाबत अत्यंत गोपनीयता पाळली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात काही मोजक्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे या तपासाची सूत्रे दिली आहेत. या पथकांमार्फत तपासाबाबत अत्यंत गोपनीयता पाळली जात आहे. प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांना काही टप्प्यांपर्यंतच माहिती काढण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. सोमवारी सकाळी हिंदुत्ववादी संघटनेचे वकील अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अ‍ॅड. प्रीती पाटील यांनी जिल्हा न्यायालयाची लेखी परवानगी घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्याशी चर्चा करून संशयित समीर गायकवाड याच्याशी १५ मिनिटे चर्चा केली. दरम्यान, एनआयए आणि कर्नाटक पोलिसांचे पथक अद्याप कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. कोल्हापूर पोलिसांच्या तपास पथकाने दुपारी अत्यंत गोपनीयरीत्या समीर गायकवाड याला खासगी गाडीतून कोल्हापुरातील काही घटनास्थळी फिरविले. पानसरे यांचे संशयित मारेकरी दुचाकीवरून ज्या मार्गावरून गेल्याचे सीसी टीव्ही फुटेजमध्ये दिसून आले, त्या मार्गावरून समीरला फिरवल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)कलबुर्गी हत्येशी धागेदोरे मिळते-जुळतेबंगलोर येथील सीआयडी पथकाचे राजशेखर यांनी पोलीस अधीक्षक शर्मा यांची भेट घेतली तसेच अटकेतील समीर गायकवाड याचीही त्यांनी कसून चौकशी केली. डॉ. शर्मा यांच्याशी चर्चा करताना धारवाड येथील एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत समीर गायकवाड याचे काही कनेक्शन आहे का? याबाबत चर्चा केली तसेच कलबुर्गी आणि पानसरे यांच्या हत्येबाबत काही तपासाचे धागेदोरे मिळते-जुळते असल्याची माहिती मिळाली. त्याबाबतही त्यांनी चर्चा करून माहिती घेतली पण या चर्चेबाबतचा तपशील मात्र त्यांनी गोपनीय ठेवला आहे.कोल्हापुरातील हिंदुत्ववाद्यांची चौकशीदरम्यान, सोमवारी दिवसभर कोल्हापुरातील काही कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची पानसरे हत्येप्रकरणी चौकशी करण्यात आली. समीर गायकवाड याचे कोल्हापुरातील काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी संबंध आहेत का? संशयित समीर गायकवाडने कोल्हापुरात येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची काही मदत घेतली आहे का? या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.