शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

समीरला शहरात गोपनीयरीत्या फिरविले

By admin | Updated: September 22, 2015 00:55 IST

वकिलांनी घेतली भेट : तपासात कमालीची गोपनीयता

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित समीर गायकवाड याला कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी दुपारी गोपनीयरीत्या कोल्हापूर शहरात काही ठिकाणी फिरविले. दरम्यान, न्यायालयाच्या परवानगीनुसार हिंदुत्ववादी संघटनेचे वकील अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अ‍ॅड. प्रीती पाटील यांनी समीर गायकवाड याची भेट घेऊन त्याच्याशी सुमारे १५ मिनिटे चर्चा केली. शिवाय बंगलोर येथील सीआयडीचे अधिकारी राजशेखर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांची भेट घेऊन धारवाड येथील एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत गायकवाड याचे काही कनेक्शन आहे का? याबाबत चर्चा केली. कॉ. पानसरे यांच्या हत्येसंदर्भात कोल्हापूर पोलिसांनी तपासाबाबत अत्यंत गोपनीयता पाळली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात काही मोजक्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे या तपासाची सूत्रे दिली आहेत. या पथकांमार्फत तपासाबाबत अत्यंत गोपनीयता पाळली जात आहे. प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांना काही टप्प्यांपर्यंतच माहिती काढण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. सोमवारी सकाळी हिंदुत्ववादी संघटनेचे वकील अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अ‍ॅड. प्रीती पाटील यांनी जिल्हा न्यायालयाची लेखी परवानगी घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्याशी चर्चा करून संशयित समीर गायकवाड याच्याशी १५ मिनिटे चर्चा केली. दरम्यान, एनआयए आणि कर्नाटक पोलिसांचे पथक अद्याप कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. कोल्हापूर पोलिसांच्या तपास पथकाने दुपारी अत्यंत गोपनीयरीत्या समीर गायकवाड याला खासगी गाडीतून कोल्हापुरातील काही घटनास्थळी फिरविले. पानसरे यांचे संशयित मारेकरी दुचाकीवरून ज्या मार्गावरून गेल्याचे सीसी टीव्ही फुटेजमध्ये दिसून आले, त्या मार्गावरून समीरला फिरवल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)कलबुर्गी यांच्या हत्येबाबत चौकशीबंगलोर येथील सीआयडी पथकाचे राजशेखर यांनी पोलीस अधीक्षक शर्मा यांची भेट घेतली तसेच अटकेतील समीर गायकवाड याचीही त्यांनी कसून चौकशी केली. डॉ. शर्मा यांच्याशी चर्चा करताना धारवाड येथील एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत समीर गायकवाड याचे काही कनेक्शन आहे का? याबाबत चर्चा केली तसेच कलबुर्गी आणि पानसरे यांच्या हत्येबाबत काही तपासाचे धागेदोरे मिळते-जुळते असल्याची माहिती मिळाली. त्याबाबतही त्यांनी चर्चा करून माहिती घेतली पण या चर्चेबाबतचा तपशील मात्र त्यांनी गोपनीय ठेवला आहे.कोल्हापुरातील हिंदुत्ववाद्यांची चौकशीकोल्हापुरातील काही कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची सोमवारी दिवसभर पानसरे हत्येप्रकरणी चौकशी करण्यात आली. समीरचे कोल्हापुरातील काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांशी संबंध आहेत का? संशयित समीरने कोल्हापुरात येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची काही मदत घेतली का? या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.शहरातील काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा वावर पोलीस अधीक्षक कार्यालयात दिसून आल्यामुळे पोलिसांनी ही चौकशी केल्याचे समजते.अटक केलेला समीर हा जानेवारी महिन्यात कोल्हापुरात रेकी करण्यासाठी आल्याचे पोलिसांच्या तपासांत निष्पन्न झाले आहे. त्यावेळी त्याने गोविंद पानसरे यांचा दिनक्रम शोधण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यावेळी समीरने पानसरे यांच्या एका व्याख्यानाच्या कार्यक्रमासही उपस्थिती दर्शविली होती. या दरम्यान, समीर हा कोल्हापुरात ‘सनातन’च्या एका साधकाकडे वस्तीस होता; तो साधक कोण? हे शोधण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याकडे जबाबदारी दिली आहे. तो तपास आज, मंगळवारपासून सुरु होणार आहे.सोमवारी दिवसभरात पानसरे हत्येसंदर्भात इचलकरंजीतील एका संशयित महिलेला कोल्हापूर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्या संबंधित महिलेचा जबाब पोलिसांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदविला आहे; पण ती महिला कोण याबाबतही पोलिसांनी गुप्तता पाळली आहे.