शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत गुंड समीर नायकवडीची ‘गेम’

By admin | Updated: October 6, 2015 00:25 IST

आष्ट्यात खळबळ : चौघे हल्लेखोर गजाआड; विहिरीत फेकला मृतदेह

आष्टा : येथील गुंड समीर मुस्तफा सय्यद ऊर्फ नायकवडी (वय २४, सध्या रा. पेठवडगाव) याचा छातीवर चाकूने सपासप वार करून शनिवारी रात्री दहा वाजता खून करण्यात आल्याचे सोमवारी उघड झाले. खुनानंतर आष्टा-कारंदवाडी रस्त्यावरील महावीर आवटी यांच्या शेतातील विहिरीत फेकून दिलेला त्याचा मृतदेह दुपारी दोन वाजता मिळाला. याप्रकरणी संग्राम रघुनाथ मोरे (२६, रा. कासार गल्ली, आष्टा), शहेनशहा यासीन मुजावर (२५, रा. परीट गल्ली, आष्टा), आकाश अरविंद पवार (२१, रा. हिरुगडे गल्ली, आष्टा) व आकाश भीमराव वर्णे (२४, रा. डांगे महाविद्यालयाजवळ, आष्टा) या संशयितांना अटक करण्यात आली आहे. येथील गुंड समीर नायकवडीविरुद्ध खंडणी, मारामारी, दहशत निर्माण करणे असे गुन्हे पोलिसांत दाखल आहेत. दररोजच्या भांडणामुळे व गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे त्याची आई व तो आठ महिन्यांपूर्वी वडगावला वास्तव्यास गेले होते, तरीही तो मित्रांना भेटण्यासाठी आष्ट्यात येत असे. त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. बहीण शासकीय नोकरीत वरिष्ठ पदावर आहे. समीरची व येथील अमित खंडागळे याची मैत्री होती. दोघे नेहमी सोबत असत. डिसेंबर २०१३ मध्ये संग्राम मोरे, लखन हाबळे, शहेनशहा मुजावर, आकाश पवार यांनी मुलीच्या प्रकरणावरून समीरला मारहाण केली होती. तेव्हापासून समीर व संबंधित तरुणांमध्ये वैर निर्माण झाले होते. शनिवारी समीर आष्टा येथे आला होता. त्याने अमित खंडागळेसोबत गाड्यावर चायनीज पदार्थ खाल्ले. मात्र त्याचवेळी तेथे आलेल्या अशरफ देसाई या तरुणाने समीरला शिवीगाळ केली, त्यामुळे समीरने अशरफच्या श्रीमुखात लगावली. अशरफने ही घटना संग्राम मोरे व आकाश पवार यांना जाऊन सांगितली. काही वेळाने संग्राम मोरे, आकाश पवार व इतर तरुण समीरला शोधत आहेत, असे समजल्यानंतर (पान १ वरून) अमितने रात्री साडेनऊ वाजता हॉटेल जाणता राजासमोर जाऊन ही माहिती समीरला दिली. समीर लगेच दुचाकीवरून भरधाव वेगात गणपती मंदिरानजीक जाब विचारण्यासाठी गेला. समीर गणपती मंदिरानजीक परिट गल्लीत आल्याचे समजल्यानंतर संग्राम मोरे, शहेनशहा मुजावर, आकाश पवार, आकाश वर्णे यांनी त्याला गाठले. त्याला दुचाकीवरून खाली पाडून छातीवर व पोटात धारदार चाकूने १५ ते २० वार केले. समीर जागीच ठार झाला. त्याला फरफटत उचलून घेऊन संग्राम मोरे, शहेनशहा मुजावर व आकाश पवार यांनी दुचाकीवर बसवले. गणपती मंदिर, मिरज वेस, यल्लम्मा मंदिरमार्गे आष्टा- कारंदवाडी रस्त्यावर मळीभागातील महावीर आवटी (मिरजवाडी) यांच्या शेतातील रस्त्याकडेच्या विहिरीत समीरचा मृतदेह फेकून दिला. तेथून सर्वजण फरारी झाले. ते जयसिंगपूर, सांगली येथे गेले व रात्री झोपण्यासाठी आष्टा-वाळवा रस्त्यावरील बिरोबा मंदिरात आले.दरम्यान, आष्टा पोलिसांना समीरवर हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सांगली, जयसिंगपूर, हातकणंगले येथे पोलीस पथके पाठवून शोध घेतला. त्यानंतर रविवारी येथील बिरोबा मंदिरात त्यांना पकडण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून आष्टा-कारंदवाडी रस्त्यावरील विहिरीत समीरचा मृतदेह शोधण्यास सोमवारी सकाळी नऊपासून सुरुवात केली. विहिरीवर युवकांच्या गर्दीमुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. अखेर दुपारी पावणेदोनच्या दरम्यान समीरचा मृतदेह ६० फूट विहिरीतून गळ टाकून वर काढण्यात आला. विहीर काठोकाठ भरल्याने मृतदेह काढण्यास विलंब लागला. संग्राम मोरे याने घटनास्थळी येऊन दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. पोलीस अधीक्षक सुनील फुलारी, अप्पर पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, सहायक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील, पोलीस उपनिरीक्षक जहॉँगीर शेख, सहायक फौजदार पी. बी. भोमरे, पोलीस नाईक सुधीर साळुंखे, पोलीस हवालदार मुकुंद कुडेकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. खुनाचा छडा तातडीने लावल्याबद्दल आष्टा पोलिसांचे अभिनंदन होत आहे. (वार्ताहर)सर्वांचीच पार्श्वभूमी गुन्हेगारीची संग्राम मोरे याचा भाऊही खुनाच्या गुन्ह्यामध्ये कारागृहात आहे. संग्रामविरुद्ध जबरी चोरी, दुखापत, मारामारीचे गुन्हे नोंद आहेत. शहेनशहा याच्याविरुद्ध गर्दी, मारामारीचे, तर आकाश पवार व आकाश वर्णे यांच्याविरुद्ध मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. चौघांना इस्लामपूर न्यायालयासमोर उभे केले असता दि. ८ अखेर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.