शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

समीर गायकवाडवर दोषारोप निश्चितीचा उद्या फैसला

By admin | Updated: March 7, 2016 01:01 IST

संपूर्ण राज्याचे लक्ष : हर्षल निंबाळकर उपस्थित राहणार--पानसरे हत्या खटला

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा खटला अन्यत्र चालविण्याचा मुद्दा निकालात निघाला आहे; त्यामुळे आरोपी समीर गायकवाड याच्याविरोधात दोषारोप निश्चितीचा फैसला उद्या, मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर होणार आहे. या सुनावणीस ज्येष्ठ सरकारी वकील हर्षल निंबाळकर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय, एसआयटी व सीआयडी (कर्नाटक) या तपास यंत्रणांत समन्वय झाल्याने नवे पुरावे पुढे येण्याची शक्यता आहे, असे असताना आरोप निश्चिती कशी करता येईल, याबाबतीत सत्र न्यायालयास अर्जाद्वारे म्हणणे सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेला दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून तपास यंत्रणेद्वारे दोषारोप निश्चित करू नये, असे म्हणणे सादर केले जाणार आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. पानसरे खटल्याची सुनावणी कोल्हापूर सोडून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत व्हावी, अशी आरोपी समीर गायकवाड याची मागणी उच्च न्यायालयाकडे होती; परंतु त्याच्या वकिलांनी ही याचिका मागे घेतली. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्याने आरोपीविरोधात दि. ८ मार्चला दोषारोपपत्र निश्चित करून खटल्याच्या सुनावणीला सुरुवात केली जाईल, असे सत्र न्यायाधीश बिले यांनी दि. २३ फेब्रुवारीच्या सुनावणीला स्पष्ट केले होते. दरम्यान, दि. २९ फेब्रुवारीला उच्च न्यायालयात पानसरे-दाभोलकर सुनावणीदरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी यांनी कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाबद्दल प्रश्न उपस्थित करून आठ मार्चला आरोप निश्चित करण्यात येतील, असा सत्र न्यायालयाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सीबीआय, एसआयटी व सीआयडी (कर्नाटक) या तपास यंत्रणांमध्ये समन्वय झाल्याने नवे पुरावे पुढे येण्याची शक्यता आहे, असे असताना आरोप निश्चित कसा काय करता येईल, या बाबतीत सत्र न्यायालयास अर्जाद्वारे म्हणणे सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेला दिले होते. न्यायालयाच्या या आदेशानुसार तपास यंत्रणेद्वारी दोषारोप निश्चित करू नये, याबाबतीत सत्र न्यायालयात म्हणणे सादर करणार आहे. त्यामुळे उद्या, मंगळवारच्या सुनावणीत कोणता निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी) न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून तपास यंत्रणेद्वारे दोषारोप निश्चित करू नये, असे म्हणणे सादर होणार