शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

समीर गायकवाडच्या जामीन अर्जावर २३ ला निर्णय

By admin | Updated: March 15, 2016 01:18 IST

गोविंद पानसरे हत्या प्रकरण : विविध खटल्यांचे दाखले; दोन्ही बाजूंकडून तासभर युक्तिवाद

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक संशयित समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावर २३ मार्चला निर्णय घेऊ, असे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी सांगितले.सोमवारी गायकवाडच्या जामीन अर्जावर न्यायसंकुलमधील बिले यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर व गायकवाडचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांचा तासभर युक्तिवाद झाला. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित समीर गायकवाड याच्यावर न्यायालयात यापूर्वी दोषारोपपत्र दाखल झाले आहे. यापूर्वी त्याचे वकील पटवर्धन यांनी दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. म्हणून पटवर्धन यांनी दुसऱ्यांदा जामीन अर्ज न्यायालयात सादर केला आहे.अ‍ॅड. पटवर्धन म्हणाले, ‘पानसरे हत्येप्रकरणी न्यायालयात यापूर्वी दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर हा खटला जलदगतीने सुरू करावा, अशी आमची मागणी आहे. तपास अधिकाऱ्यांनी पानसरे हत्या प्रकरणाचा तपास किती दिवस करावा, यावर आमचा आक्षेप नाही आहे; पण तो किती दिवस सुरू राहणार हे सरकारी पक्षाने सांगितलेले नाही. त्यामुळे समीर गायकवाड किती दिवस कळंबा मध्यवर्ती कारागृहात राहणार असे विचारून, सर्वोच्च न्यायालयातील पप्पू यादव व संजय चंद्र विरुद्ध राज्य सरकार अशा दोन खटल्यांचे दाखले दिले. पानसरे यांचे स्नेही दिलीप पवार यांनी आपल्या जीवितास धोका आहे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ते या खटल्यातील पंच साक्षीदार आहेत. त्यांनीसुद्धा गायकवाडचा जामीन अर्ज मंजूर करू नये, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सरकारी पक्षाने मांडलेले मुद्दे यापूर्वीचेच आहेत, असा युक्तिवाद करून, समीर गायकवाडला जामीन मिळावा, अशी विनंती पटवर्धन यांनी केली.विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर म्हणाले, ‘गायकवाडचा पहिला जामीन अर्ज २८ जानेवारी २०१६ ला जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. गायकवाडला जामीन मिळाल्यास तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या शाळकरी मुलावर व इतर साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, साक्षीदारांना फितूर करू शकतो. समीर हा यापूर्वी मडगाव (गोवा) बॉम्बस्फोटातील संशयित फरार रुद्रगौडा पाटील याचा मित्र होता. त्यामुळे गायकवाडला जामीन मिळाल्यास कदाचित तो रुद्रगौडा पाटीलप्रमाणे फरार होऊ शकतो. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पानसरे हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे.’ त्यांनी व्हिक्टर विरुद्ध राज्य सरकार, कऱ्हाड येथील उदय पाटील विरुद्ध राज्य सरकार, शेख अन्वर ऊर्फ शेख बाबर विरुद्ध राज्य सरकार, असे आदी चार खटल्यांचे दाखले देत युक्तिवाद मांडला. दोघांचा युक्तिवाद ऐकून बिले यांनी २३ मार्चला समीर गायकवाडच्या जामीन अर्जावर निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. अ‍ॅड. निंबाळकर यांना सरकारी वकील अ‍ॅड. चंद्रकांत बुधले यांनी, तर अ‍ॅड. पटवर्धन यांना अ‍ॅड. आनंद देशपांडे, अ‍ॅड. संजय धर्माधिकारी, अ‍ॅड. श्रीपाद होमकर यांनी सहकार्य केले.न्यायालयात मेघा पानसरे, एम. बी. पडवळे, राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. धनंजय पठाडे उपस्थित होते.सरकारी पक्षाने न्यायालयात मांडलेले मुद्दे हे यापूर्वीच मांडले आहेत. तपासांत नवीन काही नाही. त्यामुळे समीर गायकवाड याचा जामीन अर्ज मंजूर करावा.- अ‍ॅड. समीर पटवर्धन, बचाव पक्षाचे वकीलगोविंद पानसरे हत्येप्रकरणी तपास यंत्रणा मुळापर्यंत जाऊन व कुशल पद्धतीने तपास करीत आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तपास यंत्रणेचे काम सुरू आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज मंजूर करू नये.- अ‍ॅड. हर्षद निंबाळकर,विशेष सरकारी वकील,