शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दहशत माजवणाऱ्यांना जशास तसे उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:25 IST

शिरोली : टोप, ता. हातकणंगले येथील गायरान जमिनीत दगड उत्खननाच्या मुद्द्यावरून सोमवारी (दि.२०) झालेल्या धुमश्चक्रीच्या घटनेवरून टोप ...

शिरोली

: टोप, ता. हातकणंगले येथील गायरान जमिनीत दगड उत्खननाच्या मुद्द्यावरून सोमवारी (दि.२०) झालेल्या धुमश्चक्रीच्या घटनेवरून टोप ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. वडार समाज वारंवार दहशत दाखवत मारामारी करत आहेत. त्यामुळे या घटनांना पायबंद घालण्यासाठी या पुढे जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा टोपमधील प्रमुख मंडळी व तरुणांनी दिला. टोपमध्ये दोन गटांत झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी ग्रामस्थांनी कल्लेश्वर मंदिरात बैठक घेतली. यावेळी हाणामारीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवारी गाव बंद ठेवून मूक मोर्चा काढण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. टोप गाव दगड खाणी व क्रशर व्यवसायासाठी प्रसिद्ध असून दगड खाणीत उत्खनन व वाहतूक व्यवसायातून आलेली बेपर्वाई सामाजिक शांतता बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यासाठी सर्वसामान्य कष्टकरी समाजाला ठराविक मंडळींनी वेठीस धरले आहे. त्यामुळे त्यांना पायबंद घालणे गरजेचे असल्याचा सूर बैठकीत उमटला. गायरान जमिनीत कोणत्याही परिस्थितीत अवैध उत्खनन करू द्यायचे नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. गायरान जमिनीत उत्खनन झाल्यास परिसरातील जलस्रोत्र वृक्षसंपदा नाहीसी होईल. जनावरांचा चारा, पशू-पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात येईल. बोअर ब्लास्टमुळे परिसरातील शेती, रहिवासी घरे यांचे नुकसान होते. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. त्यामुळे गायरानात वृक्ष लागवड करा, जनावरे शेळ्या मेंढ्यासाठी चराई क्षेत्र, मुलांना खेळासाठी मैदान यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी प्रशासनाकडे करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

सातत्याने होणाऱ्या या घटनांमुळे गावात संतापाचे वातावरण असून उत्स्फूर्तपणे नागरिक या बैठकीला एकवटले होते. बैठकीला शेकडोंच्या संख्येने युवक व गावातील सर्वपक्षीय प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होते.