शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

संभाजीराजेंच्या ‘अभिनंदना’साठी गडहिंग्लजमध्ये ‘चढाओढ’ !

By admin | Updated: June 16, 2016 00:59 IST

राष्ट्रवादीने लावले डिजीटल : जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी गाठला राजवाडा

राम मगदूम -- गडहिंग्लज --नूतन खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या अभिनंदनासाठी गडहिंंग्लजमध्येही कार्यकर्त्यांची चढाओढ झाली. जनता दलाचे माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावे व बांधकाम सभापती नितीन देसाई यांनी राजवाड्यावर समक्ष भेटून तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसंत यमगेकर व नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते रामदास कुराडे, नगरसेवक किरण कदम व सहकाऱ्यांनी येथील दसरा चौकात अभिनंदनाचा डिजीटल फलक लावून छत्रपतींचे अभिनंदन केले आहे.गतवेळच्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी जनता दल-जनसुराज्य आघाडीकडून पालिकेची सत्ता काढून घेण्यासाठी बाबासाहेब कुपेकर व हसन मुश्रीफ यांनी जोरदार फिल्डींग लावली होती. त्यावेळी संभाजीराजेंनीही गडहिंग्लजमध्ये आठवडाभर मुक्काम ठोकून राष्ट्रवादीच्या विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त केली होती. मात्र, तीन वर्षांनंतर जनता दलाने राष्ट्रवादीकडून पुन्हा सत्ता काढून घेतली आहे.दरम्यान, लोकसभा निवडणुकीत संभाजीराजेंचे नाव मागे पडले. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक व शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात सामना झाला. महाडिक यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून त्यांच्या विजयासाठी मुश्रीफांनी कंबर कसली होती. त्यावेळी येथील जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी मंडलिकांना ‘ताकद’ दिली होती. लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात असतानाच संभाजीराजेंनी जनता दलाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड.श्रीपतराव शिंदेंची त्यांच्या घरी जावून भेट घेतली होती.छत्रपती व शिंदे घराण्याचे अतूट ऋणानुबंध असतानाही तुमच्याविरोधात प्रचार केला आणि गडहिंग्लज नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. माझ्याकडून मोठी चूक झाली, मनमोकळं करायला, चुकीची दुरूस्ती करायला आलोय. मला समजून घ्या, अशी विनंती दस्तुरखुद्द संभाजीराजेंनी शिंदे यांना केली होती. निवडणुकीपासून अलिप्त राहिलेल्या संभाजीराजेंनी घेतलेल्या शिंदेंच्या भेटीची त्यावेळी जिल्हाभर चर्चा झाली होती.गडहिंग्लज शहर आणि तालुक्याशी छत्रपती घराण्याचे घनिष्ठ संबंध आहेत. येथील अनेक कुळांकडे छत्रपती घराण्याची शेतजमीन असून शहरातील काही विकासकामांसाठीही त्यांनी जागा दिली आहे. त्यामुळेच हा ऋणानुबंध अधिक घट्ट झाला आहे. किंबहुना, छत्रपतींचा शब्द प्रमाण मानणारी रयत आणि कार्यकर्ते अजूनही याठिकाणी आहेत. या पार्श्वभूमीवरच ‘छत्रपतीं’च्या आशीर्वादाकरिताच अभिनंदनासाठी चढाओढ झाली आहे.डिजीटलची ‘जिल्ह्यात’ चर्चा !गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मुश्रीफ यांनी शिंदे यांच्याशी युती केली. नगरपालिकेत एकमेकांच्या विरोधात असताना झालेली ही युती राष्ट्रवादीच्या ‘काही’ कार्यकर्त्यांना रूचली नाही, त्यामुळे ‘ते’ प्रचारातसुद्धा नावापुरतेच दिसले. गडहिंग्लज पालिकेच्या निवडणुकीसंदर्भात मुश्रीफांनी अद्याप कोणतेही भाष्य केलेले नसतानाच छत्रपतींच्या अभिनंदनासाठी लागलेल्या डिजीटलची जोरदार चर्चा आहे.