शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

बखरकारांकडून संभाजीराजेंची बदनामी

By admin | Updated: December 6, 2015 01:32 IST

रमेश जाधव : ‘अद्वितीय छत्रपती श्री संभाजी महाराज’ ग्रंथाचे प्रकाशन

कोल्हापूर : बखरकारांनीच छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे. बखरकार मल्हार रामचंद्र चिटणीस यांनी पूर्वग्रहदूषितपणा ठेवून संभाजी महाराजांचा बदनामीजनक इतिहास रंगवून तो मांडला, असे प्रतिपादन विचारवंत प्रा. डॉ. रमेश जाधव यांनी शनिवारी येथे केले. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे अ‍ॅड. अनंत दारवटकर (पुणे) लिखित ‘अद्वितीय छत्रपती श्री संभाजी महाराज : खंड १ ते ५’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ग्रंथाचे प्रकाशन प्रा. डॉ. रमेश जाधव यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थितीत इतिहासतज्ज्ञ प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई, प्रबोधन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जे. बी. शिंदे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष डॉ. राजीव चव्हाण, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची होती. यावेळी प्रा. डॉ. रमेश जाधव म्हणाले, संभाजी महाराजांचे रंगविण्यात आलेले चित्र हे बखरीवर आधारितच आहे. त्यामधून मल्हारराव चिटणीस यांच्यासारख्या बखरकारांनी वाईट हेतूने चुकीचा इतिहास मांडला. असे असले तरी काही इतिहासकारांनी संभाजीराजेंचे चांगले चित्रही समोर आणले हे नाकारून चालणार नाही. अनंत दारवटकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगितला जातो. हे लक्षात आल्यावर खऱ्या इतिहासाची चिकित्सा जागृत झाली. त्यानंतर आपण याकडे वळलो. भारत संशोधन मंडळात जायला लागल्यानंतर यातील अनेक गोष्टी समोर आल्या. खरा इतिहास मांडण्याच्या हेतूनेच आपण संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा ग्रंथ लिहू शकलो. संशोधनातून या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. जे. बी. शिंदे म्हणाले, इतिहासाचा विपर्यास केला जात असल्याची सद्य:स्थिती आहे. अशा वातावरणात संभाजी महाराजांवरील ग्रंथ प्रकाशित होत असल्याने नवे ऐतिहासिक पर्व सुुरू होण्यास हातभार लागणार आहे. संभाजी महाराजांचे चित्र त्रोटक होते; परंतु या ग्रंथाच्या माध्यमातून समग्र इतिहास समोर आला आहे. यामध्ये अनेक कागदपत्रांची छाननी व अभ्यासपूर्ण लेखन करण्यात आल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)