शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीनगर कामगार चाळ धोकादायक

By admin | Updated: August 6, 2015 23:47 IST

महापालिकेची नोटीस : १०० कुटुंबांचा जीव टांगणीला, रहिवाशांची कॉम्प्लेक्समध्ये पुनर्वसनाची हमी

गणेश शिंदे  कोल्हापूर --४० वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या संभाजीनगर कामगार चाळीमधील कुटुंबांना महापालिका प्रशासनाने नोटिसा पाठविल्यामुळे या चाळीत राहणाऱ्या सुमारे १०० कुटुंबांचा जीव टांगणीला लागला आहे. कोल्हापूर महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी नगरपालिकेने १९७४ मध्ये संभाजीनगर येथील रेसकोर्स नाक्यासमोर ‘संभाजीनगर कामगार चाळ’ या नावाने महापालिकेचे सफाई कामगार व झाडू कामगार यांच्यासाठी तत्कालीन आयुक्त डी. एन. कपूर व देवस्थळी यांच्या कारकिर्दीत ही चाळ बांधण्यात आली. दरम्यान, या चाळीत १९४८ मध्ये चार बैठी (कौलारू ) घरे होती. ती घरे सुमारे ३०० स्क्वेअर फुटांची, तर त्यानंतर बांधण्यात आलेली आरसीसीची घरे सध्या सुमारे २७० स्क्वेअर फुटांची आहेत. साधारणत: दीड ते दोन एकरांत ही चाळ वसली आहे.चाळीमध्ये पाच इमारती असून तिथे सुमारे शंभर कुटुंबांचे वास्तव्य आहे. महापालिका प्रशासन महापालिकेच्या या कामगारांकडून पगारामधून घरभाडे भत्ता कपात करते. दरम्यान, ४ आॅगस्ट २०१५ रोजी महापालिका प्रशासनाने कामगार चाळीतील कुटुंबांना ही चाळ धोकादायक बनली असल्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. यामुळे नागरिक चिंतेत आहेत.महापालिका इमारत पाडून उभारणार कॉम्प्लेक्स...संभाजीनगर कामगार चाळ पाडून या ठिकाणी कॉम्प्लेक्स बांधण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे. या कॉम्प्लेक्समध्ये खाली दुकानगाळे, तर वरच्या मजल्यावर या कामगारांना घरे बांधून देणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.रहिवाशांचेही कॉम्प्लेक्समध्ये पुनर्वसन करण्याची हमीही चाळ धोकादायक बनली आहे. आपण ती १५ दिवसांत खाली करणे आवश्यक आहे. या ठिकाणी नवीन इमारत बांधून २००५ मध्ये झालेल्या महासभेच्या ठरावानुसार नवीन इमारतीत तुमचे पुनर्वसन करण्यात येईल, अशा नोटिसा महापालिका प्रशासनाने या कुटुंबांना पाठविल्या आहेत.चाळीमधील सर्वांची लवकरच याप्रश्नी बैठक घेणार आहे व त्यात चर्चा केली जाईल. अजून ही इमारत २५ ते ३० वर्षे टिकेल, असे प्रथमदर्शनी दिसून येते. याप्रश्नी प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी आहे. - अनिल मोहन पटवणे, रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते