शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीराजे आज रायगडावरून आरक्षणासंदर्भातील भूमिका जाहीर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : दुर्गराज रायगड किल्ल्यावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आज, रविवारी सकाळी सहा वाजता ध्वज ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : दुर्गराज रायगड किल्ल्यावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आज, रविवारी सकाळी सहा वाजता ध्वज पूजनाने शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यास सुरुवात होणार आहे. या सोहळ्यामध्येच खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरवर्षी या सोहळ्यास राज्यासह परराज्यांतून लाखो शिवभक्त येतात. मात्र, मागील वर्षापासून कोरोना संसर्गामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला होता. त्यानंतर पुन्हा यावर्षीही कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे पुन्हा एकदा केवळ २२ मावळ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा आज, रविवारी होणार आहे. तत्पूर्वी, शनिवारी सायंकाळी पाच वाजता खासदार संभाजीराजे व यौवराज शहाजीराजे यांचे चित्त दरवाजा येथे स्वागत करण्यात आले. त्यानंतर स्थानिक सरपंचांच्या उपस्थितीत गड पूजन झाले. त्यानंतर गड चढण्यास सुरुवात झाली. त्यांच्यासोबत केवळ २२ मावळ्यांच्या उपस्थितीत महादरवाजा येथे तोरण बांधण्यात आले. खासदार संभाजीराजे व यौवराज शहाजीराजे यांनी शिकाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. उपस्थित शिवभक्त व मावळ्यांसोबत ऐतिहासिक विषयांवर चर्चासत्र झाले. उशिरा रात्री शिकाईदेवीचा गोंधळ व पोवाडा गायन झाले. यावेळी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, हेमंत साळोखे, संजय पवार, विनायक फाळके, प्रसन्न मोहिते, उदय बोंद्रे, राम यादव, सत्यजित आवटी, सागर पाटील, योगेश केदार, राहुल शिंदे, सुखदेव गिरी आदी उपस्थित होते.

-------------------------

बावीस मावळ्यांकरिता १२०० पोलिसांचा फौज फाटा

यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने लाखो भक्तांना येण्यास मज्जाव केला आहे. यासह खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका राजसदरेवरून जाहीर करणार आहेत. त्यामुळे रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड गावासह गडाच्या सुरुवातीला व गडावर असे एकूण १२०० पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. त्यामुळे या गडावर पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

-------------------------

आजच्या सोहळ्याचे स्वरूप असे,

सकाळी ६.०० वा. ध्वज पूजन

७.०० वा. ध्वनिमुद्रित पोवाडा गायन

८.३० वा. खासदार संभाजीराजे, यौवराज शहाजीराजे यांचे उत्सवमूर्तीसोबत आगमन

८.४५ वा. शिवराज्याभिषेक सोहळ्यास सुरुवात

९.०० वा. पालखी सोहळा जगदीश्वर मंदिराकडे रवाना होणार

१०.३० वा. जगदीश्वर मंदिरात रायरेश्वर पूजा

१०.४५ वा. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून सोहळ्याची सांगता

.....