शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

समरजितसिंह यांनी दाखविले राजकीय कसब

By admin | Updated: November 11, 2015 00:03 IST

शाहू कृषी संघ : जुन्या, नव्यांचा मेळ घातल्याने निवडणूक बिनविरोध

जहाँगीर शेख -कागल --येथील शाहू समूहातील १५ कोटी वार्षिक उलाढाल असणाऱ्या श्री छ. शाहू कृषी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. १५ जागांसाठी बरोबर १५ अर्ज दाखल होत ही निवडणूक बिनविरोध झाली. या संघाचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनांनंतर शाहू समूहातील ही पहिलीच निवडणूक असल्याने विक्रमसिंहराजेंच्या प्रती श्रद्धा आणि विद्यमान अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या प्रती असणारी सहानुभूती या निमित्ताने सभासदांनी दाखवून दिली. असे असले तरी समरजितसिंह घाटगेंनी जुन्या-नव्या संचालक मंडळांची रचना करीत आपल्यातील राजकीय कसबची झलकही दाखवून दिली आहे. या संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित होते. कारण विक्रमसिंह राजेंच्या निधनामुळे या शाहू समूहात आजही त्यांची पोकळी जाणवत आहे, तर राजे गट वगळता संजय घाटगे गटाला मानणारे सभासद तसेच मुश्रीफ गटाचे काही समर्थक सभासद या संघात आहेत, पण लोकभावनेप्रमाणेच आमदार हसन मुश्रीफ आणि संजय घाटगे यांनी या निवडणुकीकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामध्ये सदैव बंडखोरीच्या पवित्र्यात असणारे काही स्वयंभू नेते होते. यामुळे समरजितसिंह घाटगेंना पॅनेल रचना करण्यासाठी मोठे पाठबळ मिळाले. त्यांनी भविष्यातील या कृषी संघाची व्याप्ती आणि व्यवसाय तसेच संघटन याचा मेळ घालत पॅनेलची रचना केली. पाच संचालकांना थांबविले. त्यामध्ये ज्येष्ठ संचालक धोंडिराम मगदूम यांची तब्येत ठीक नसते. विजयसिंह घोरपडे यांच्या जागी प्रशांत घोरपडे (खडकेवाडा) यांना संधी दिली. युवराज पसारे (कागल) यांना दूध संघावर संधी दिल्याने त्यांच्या पत्नी वैशाली यांच्याऐवजी करनूरच्या विमल चौगुलेंना संधी देत करनूर गावाला पहिल्यांदा प्रतिनिधित्व दिले, तर सुनील मगदूम (सिद्धनेर्ली), उत्तम पाटील (बाचणी) ही तरुण बिग्रेड निवडून पुढील इरादेही स्पष्ट केले. नानासाहेब घाटगे, अरुण शिंत्रे, रंजना सातवेकर यांना संधी देत भागनिहाय प्रतिनिधित्व जपले. पंकज वीरकुमार पाटील यांच्यावर कर्नाटक राज्याची जबाबदारी कायम ठेवली. एकूणच समरजितसिंह घाटगे यांनी कृषी उद्योग संघाचा आणि राजकीय संघाचाही विचार केल्याचे स्पष्ट झाले आहे. राजेंची शिस्त कायम....विक्रमसिंहराजे गटात कोणतीही निवडणूक लढविताना गटाची परवानगी घेतल्याशिवाय उमेदवारी अर्ज दाखल केले जात नाहीत. या निवडणुकीतही इच्छुकांनी आपले अर्ज समरजितसिंह घाटगे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांनी सांगितलेल्या १५ जणांनीच निवडणुकीचे अर्ज भरले. संघाची एक पंचवार्षिक २००५ची निवडणूक वगळता सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.