शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

समरजितसिंह घाटगे अखेर भाजपमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2016 01:48 IST

चंद्रकांतदादांच्या प्रयत्नांना यश : शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार प्रवेश

कोल्हापूर : छत्रपती शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा भाजपमधील प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. उद्या, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी सकाळी दहा वाजता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले ‘पुणे म्हाडा’चे अध्यक्षपदही त्यांना देण्याचे निश्चित झाले असून, त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एका वजनदार सहकार समूहाचे नेतृत्व पक्षात आणण्यामध्ये महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना यश आले आहे. गेल्या महिन्यात गडहिंग्लज येथील भाजपच्या कार्यक्रमात जिल्ह्यात भूकंप करण्याची घोषणा चंद्रकांतदादा पाटील यांनी केली होती. त्याची सुरुवात झाली असून अजूनही अनेक नेते रांगेत असल्याने एकामागोमाग अनेकांचे प्रवेश होण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे. सहकारातील आदर्श ज्यांनी निर्माण केला त्या विक्रमसिंह घाटगे यांचा वारसा चालविणाऱ्या समरजितसिंह यांना पक्षात घेण्यासाठी पाटील यांचे गेली काही महिने प्रयत्न सुरू होते. २६ जूनला देवेंद्र फडणवीस हे कागलला शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी शिरोली ते कागल या प्रवासादरम्यान समरजित यांना मुख्यमंत्र्यांच्या (पान ११ वर) मी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी चंद्रकांतदादा पाटील यांची मनापासून इच्छा होती. गेल्या वर्षभरापासून त्यांनी मोठं योगदान दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कागलला घेऊन येण्यापासून प्रत्येक टप्प्यावर त्यांनी यासाठी प्रयत्न केले. तसेच शेवटच्या टप्प्यात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही अगदी राजे असते तर जसे मार्गदर्शन केले असते त्या पद्धतीने मला दिशा दिली आणि माझा हा निर्णय झाला. विक्रमसिंह घाटगे गटाला शोभेल अशाच पद्धतीने आणि विश्वासाला पात्र राहून काम करीत राहणार आहे. - समरजितसिंह घाटगे,अध्यक्ष, शाहू साखर कारखाना