शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

माजी आमदारांकडून मतांची विक्री

By admin | Updated: January 4, 2016 00:30 IST

हसन मुश्रीफ : विधान परिषद निवडणुकीतील ‘कागल’च्या राजकारणावर टीका

कागल : विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कागल-गडहिंग्लज मतदारसंघातील दोन राजकीय गटांनी आपल्या गटांचा जाहीर लिलाव करीत उमेदवारांकडून दलाली घेत मते विकली, अशी टीका दोन माजी आमदारांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. कागल तालुक्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी गणपतराव फराकटे, नवीद मुश्रीफ, भैया माने, शशिकांत खोत, कृष्णात पाटील, अंकुश पाटील, विकास पाटील, शिवानंद माळी प्रमुख उपस्थित होते. यावेळी कागलचे सभापती श्रीकांत ऊर्फ पिंटू लोहार यांनी स्वाभिमानी भूमिका घेत सतेज पाटील यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले.आमदार मुश्रीफ म्हणाले, आम्ही सुरुवातीलाच राष्ट्रीय कॉँग्रेस ज्याला उमेदवारी देईल त्याला निवडून आणू, असे जाहीर केले होते. आ. महाडिक वगळता सतेज पाटील, पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे यांनी याबद्दल प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याशी मला फोनवर बोलावयास लावले. मी एकदा शब्द दिला की तो पाळतो. धनंजय महाडिक यांच्या खासदारकीसाठी मी मंत्रिपद पणाला लावून राजीनाम्याची घोषणा केली होती म्हणून लोकसभा, विधानसभा, गोकुळ, जिल्हा बॅँक, शेतकरी संघ, बाजार समिती आता विधान परिषदेत आमच्या धोरणांचा विजय झाला आहे. आमच्या मतदारसंघात मुरगूडकर पाटील गटाची अडचण मी समजू शकतो. मात्र, दोन गटांनी आपले गटच लिलावात काढले. यावेळी बोलताना भैया माने म्हणाले की, कागल पंचायत समितीचे सभापती पिंटू लोहार हे स्वाभिमानी योध्यासारखे राहिले. कारण त्यांनी महाडिक यांना पाठिंबा देण्यास स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले की, महाडिक यांनी अमरीश घाटगेंना ‘गोकुळ’मधून उमेदवारी नाकारली. पण, सतेज पाटील यांनी घाटगेंना उमेदवारी देऊन निवडून आणले. सतेज पाटील यांच्या मदतीचे दातावरील किटाण निघाले नाही, तोपर्यंत त्यांना विसरायचे हे जमणार नाही. म्हणून त्यांचे जाहीर अभिनंदन करूया. बिद्री साखर कारखाना पुन्हा ‘के.पीं.’कडेच राहीलकेवळ संचालक मंडळाची मुदत संपली आहे म्हणून बिद्री साखर कारखान्यावर दुर्दैवाने प्रशासक आले आहे. दुसरे कोणतेही कारण नाही. के. पी. पाटील यांनी अतिशय उत्कृष्टपणे हा कारखाना चालविला आहे. कारखान्याची आर्थिक स्थिती मजबूत केली आहे. पोटच्या पुत्राप्रमाणे त्यांनी कारखान्यावर प्रेम केले आहे. म्हणून ‘बिद्री’त पुन्हा के.पी.च असतील यात शंकाच नाही, असे आमदार हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.