शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कागल पालिकेकडून मैलायुक्त पाण्याचीही विक्री

By admin | Updated: May 16, 2017 01:31 IST

आदर्शवत कामगिरी : जिल्ह्यातील नागरिकांना मैला उपसा करून देण्याबरोबरच विल्हेवाटीचीही सुविधा

जहाँगीर शेख । लोकमत न्यूज नेटवर्ककागल :घनकचरा व्यवस्थापन आणि कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प राबवून राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या कागल नगरपरिषदेने सर्वच घटकांनी दुर्लक्षित केलेल्या ‘मैला उपसा आणि विल्हेवाट’ यामध्येही आदर्शवत अशी कामगिरी बजावली आहे. शौचालयांचा मैला उपसा करून देण्याची जिल्हा व सीमाभागातही ‘सेवा’ पुरविण्याबरोबरच हे मैलायुक्त पाणीही रासायनिक प्रक्रियेसाठी कारखान्यांना विकण्याचा ‘उपयुक्त उद्योग’ नगरपालिकेने केला आहे. साधारणत: आठ-दहा वर्षांचा कालखंड झाला की शौचालयाची शौचकुप्पी किंवा टाकी उपसा करावी लागते. काहीवेळा गळती दुरुस्तीसाठी तर नवीन बांधकामात शौचालय बदलताना हा मैला उपसा करावा लागतो. सध्या प्रत्येक घरात शौचालय आहेत. मात्र, त्या तुलनेत मैला उपसा करून देणारे घटक नाहीत. त्याचबरोबर केंद्र सरकारने मानवी हाताने मैला साफ करणे, त्याचे वहन करणे याला कायद्याने बंदी घातली आहे. सरकारी शौचालयांची साफसफाई सरकारी यंत्रणा करते पण वैयक्तिक मालकीच्या शौचालयांचा मैला उपसा कोणी करायचा? हा प्रश्न असतो. या अडचणीचा विचार करून कागल नगरपरिषदेच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाने खासगी सेवा देण्यास प्रारंभ केला आहे. गेली दहा वर्षे हा उपक्रम सुरूआहे. त्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे व्हॅक्युम प्रेशर मशीन्स खरेदी केली आहेत. ही मशीन एका ट्रॅक्टर टँकला जोडली आहेत. स्वच्छता विभागाकडील शैलेश म्हैतर, राहुल म्हेतर, आकाश कांबळे, रमेश कानडे, विकी कांबळे, युवराज सोनुले यांचे हे पथक यामध्ये प्रशिक्षित केले आहे. कोणतीही जाहिरात न करता कोल्हापूर जिल्ह्यातून तसेचसीमावर्ती भागातून मोठी मागणी आहे. आठवडाभर आधीच नोंदणी करावी लागते. शहरातील स्वच्छतेचे काम पाहात हे पथक नागरिकांना हा मैला उपसा करून देते. गेली आठ-दहा वर्षे आम्ही स्वच्छता विभागातर्फे हा उपक्रम राबवित आहोत. कागल शहरात १४ ठिकाणी सार्वजनिक शौचालये आहेत. याची निगा राखत नागरिकांना खासगी सेवा दिली जाते. कारखान्यांना हे मैलायुक्त पाणी विक्री केल्यामुळे या पाण्याची विल्हेवाटेची? याची चिंता करावी लागत नाही. - नितीन कांबळे, स्वच्छता निरीक्षक, कागल नगरपरिषद