शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

शिंदे यांच्यामुळेच ‘गडहिंग्लज’ बंद

By admin | Updated: July 18, 2015 00:20 IST

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप : श्रीपतराव शिंदेंच्या कार्यकाळातील कारभाराची चौकशी करा

कागल : श्रीपतराव शिंदे यांच्यामुळेच गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना बंद पडला होता. साखर कारखाना मोडल्यामुळेच जनतेने विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवून दिली. आमदार मुश्रीफ यांनी लोकप्रतिनिधींचे कर्तव्य पार पाडत पुढाकार घेऊन सक्षम कंपनी आणून कारखाना सुरू केला. असे असताना श्रीपतराव शिंदेंनी गडहिंग्लज साखर कारखान्याची चौकशीची मागणी करणे म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ असा हा प्रकार असून, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिंदेंच्या कार्यकाळातील गैरकारभाराच्या चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप ऊर्फ भैया माने, तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, नगराध्यक्षा संगीता गाडेकर, युवराज पाटील, गणपतराव फराकटे, विकास पाटील, आदी पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी निवेदन प्रसिद्धीस दिले.निवेदनात म्हटले आहे की, श्रीपतराव शिंदेंच्या अध्यक्षपदाच्या काळात कारखाना डबघाईला आला होता. बिले न मिळाल्याने ऊस उत्पादकांवर देशोधडीला लागण्याची वेळ आली होती. कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. कारखाना वाचविण्यासाठी त्यांच्या सहकारी संचालकांनाच त्यांच्यावर अविश्वास ठराव आणावा लागला. कारखाना वाचविण्यासाठी त्यांची हकालपट्टी करावी लागली. त्यानंतर आमदार मुश्रीफ यांनी कारखाना वाचविण्यासाठी पुढाकार घेतला. हा त्यांचा गुन्हा आहे का? संपूर्ण साखर उद्योगच आज सरकारच्या धोरणामुळे अडचणीत आला आहे. ब्रीक्स कंपनीच्या माध्यमातून आ. मुश्रीफ त्यातून निश्चितच मार्ग काढतील. मात्र, कारखाना मोडणारेच जाब विचारत आहेत, हे हास्यास्पद आणि घृणास्पद आहे. मुश्रीफसाहेबांच्या प्रयत्नानेच कारखाना वाचला, नाहीतर ‘दौलत’सारखी अवस्था झाली असती, हे जनता जाणून आहे. म्हणून श्रीपतराव शिंदेंच्याच चेअरमनपदातील कार्यकाळाची सहकारमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत. (प्रतिनिधी)म्हणून चौथ्यांदा आमदार....निवेदनात म्हटले आहे की, मुश्रीफसाहेबांनी कोणतेही ढोंग-सोंग-नाटक न करता प्रामाणिकपणे जनतेच्या हितासाठीच आपले आयुष्य झोकून दिल्यामुळे जनतेने त्यांना सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून दिले आहे. पोपटपंची भाषणबाजी न करता धडाडीने लोकांचे प्रश्न सोडविले आहेत. या उलट जनतेने श्रीपतराव शिंदेंना म्हणूनच घरी बसविले आहे, अशी टीकाही निवेदनात केली आहे.