गडहिंग्लज : गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन व महागावच्या संत गजानन शिक्षण समूहातर्फे आयोजित गडहिंग्लज प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत आजच्या चौथ्या दिवशी साई प्लाझा वॉरियर्सने सलग दुसरा, तर साई एज्युकेशनने हिरण्यकेशी फौंडेशनला नमवून धक्का दिला. शहरातील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.चुरशीच्या सामन्यात साई प्लाझा वॉरियर्सने जय-वरद स्पोर्टस्ला २-१ ने थांबवून स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. साई प्लाझाचा आघाडीपटू देवेंद्र पाटील याने मैदानी गोल करून संघाचे खाते उघडले. टी. आर. मोहन, समीर पठाण, निखिल केसरकर यांनी आक्रमक खेळ केला. साईच्या ऋषिकेश सालुढीकर याने दुसरा गोल केला. जय-वरदकडून श्रेयस ठोंबरे याने एकमेव गोल केला.सलग दोन पराभव स्वीकारणाऱ्या साई एज्युकेशनने ‘डू आॅर डाय’च्या सामन्यात हिरण्यकेशी फौंडेशन संघावर २-० ने विजय मिळवून स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले. साईच्या सागर साळवी, दिग्विजय अस्नेकर यांनी गोल केले. साईकडून व्यंकटेश जे, ओमकार घुगरी, ओंकार मस्के, गगनदीप सावंत, तर हिरण्यकेशीच्या प्रथमेश धबाले, राहुल भालेराव यांचा खेळ उत्कृष्ट झाला. (प्रतिनिधी)
साई प्लाझा वॉरियर्सचा दुसरा विजय
By admin | Updated: May 20, 2015 00:16 IST