शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टिका, स्पष्टच बोलले
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
5
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
6
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
7
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
8
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
9
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
10
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
11
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
12
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
13
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
14
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
15
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
16
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
17
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
18
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
19
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
20
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...

तिळावर लिहिली साई लीलामृत

By admin | Updated: March 3, 2015 00:26 IST

गजेंद्र वाढोवणकरांची कला : वारणानगरमध्ये कौतुक

वारणानगर : तांदूळ, तीळ व मोहरी यावर गजेंद्र वाढोवणकर यांनी लिहिलेल्या साई लीलामृत ग्रंथाचे येथील शास्त्री भवनमध्ये अनेकांनी दर्शन घेऊन त्यांच्या अद्भूत शैलीचे कौतुक केले.औरंगाबाद येथील राष्ट्रपती पुरस्कार विजेते गजेंद्र वाढोवणकर यांनी आपल्या कलेतून साई लीलामृत ग्रंथ तांदूळ, तीळ व मोहरी यावर लिहिला आहे. हा ग्रंथ दान स्वरूपात मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात शिर्डी येथील साई संस्थानकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. तो ग्रंथ तेथील म्युझियममध्ये ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.सोमवारी सकाळी गजेंद्र वाढोवणकर व सहकाऱ्यांचे वारणानगर येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. ही दिंडी शास्त्री भवन येथे आली. त्याठिकाणी वारणासमूहाचे नेते विनय कोरे यांच्या हस्ते पूजन व आरती होऊन ग्रंथ सर्वांना दर्शनासाठी खुला करण्यात आला. पहिल्या पानावरील श्री सार्इंची हसऱ्या चेहऱ्याची प्रतिमा व ग्रंथातील मजकूर सर्वांना भिंगाद्वारे दाखविण्यात आला. यावेळी वारणा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा शोभाताई कोरे, संचालक सुभाष पाटील, कार्यकारी संचालक व्ही. एस. चव्हाण, प्र. कार्यकारी संचालक व्ही. एस. कोले, बी. जी. सुतार, एस. ए. कुलकर्णी, आर. डी. पाटील, जयसिंग पाटील, के. डी. पाटील, स्नेहा कोरे, शुभलक्ष्मी कोरे, मंगला पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी गजेंद्र वाढोवणकर, त्यांची पत्नी वीणा, वडील सूर्यकांत, आई कमलताई तसेच गोकुळ पाटील, गणेश उपाध्ये यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)भारतातील अनेक शहरांसह सहा देशात या ग्रंथाचे अनेकांनी दर्शन घेतले आहे. आपण एका वेगळ्याच स्फूर्तीतून हा ग्रंथ आॅस्ट्रेलियामध्ये लिहिला आहे. त्यासाठी पाच लाख चार हजार ५४४ तांदूळ व तीळ लागले आहेत. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे छायाचित्र, व्हाईट हाऊस व झेंड्याची प्रतिकृती तांदळावर काढून त्यांना भेट दिली आहे. - गजेंद्र वाढोवणकर.