शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

‘सागर’ला हवाय मदतीचा हात

By admin | Updated: July 31, 2014 23:29 IST

लहानपणीच अनाथ; मेकॅनिकल डिप्लोमासाठी घ्यावयाचाय प्रवेश

कोल्हापूर : आई-वडिलांचा पत्ता नाही, स्वत:चे मूळ नाव माहीत नाही, अशा परिस्थितीत वयाच्या ६ व्या वर्षी हरवलेला, अशी नोंद झालेल्या सागर शहाजी वीर याने जीवनातील अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांना सामोरे जात शालेय शिक्षणाचा प्रवास उत्तुंगपणे पार पडला. आता आयुष्यातील करिअरच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण वळणावर तो आला आहे. त्याला ‘डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग’च्या प्रवेशासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. अनाथपणा पुसून आपली वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या सागरला समाजातील दानशूरांनी हात देणे गरजेचे आहे.‘हरवलेला’ अशी नोंद असलेल्या सागरला एक नाव आणि आडनांव देवून ‘अनाथ’असा उल्लेख केलेल्या दाखल्यासह मुंबईतील पोलिसांनी कणेरीवाडी (ता. करवीर) येथील जगदाळे बालगृहात दाखल केले. येथील स्वामी समर्थ विद्यालयात त्याने दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. सुटीच्या वेळेत केटरिंगमध्ये वाढपी तसेच अन्य लहान-सहान कामे करून त्याने आपला शैक्षणिक खर्च भागविला. अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला कोल्हापुरातील शासकीय पुरुष राज्यगृहात पाठविण्यात आले. २०१३ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत त्याने ८२ टक्के गुण मिळविले. अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षण घेऊन सन्मानाने जगायचे हे स्वप्न बाळगलेल्या सागरने मुक्त विद्यापीठाच्या डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. यावेळी प्रात्यक्षिकांसाठी काही कंपनीमध्ये काम करताना त्याला शारीरिक त्रास सुरू झाला. त्यामुळे त्याला हे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. प्रकृती ठीक झाल्यामुळे आता डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घ्यायचा आहे. या अभ्यासक्रमाचे शुल्क ३९ हजार रुपये आहे. त्याची शिक्षणाबाबतची धडपड आणि परिस्थिती पाहून या कॉलेजमधील काही प्राध्यापकांनी त्याला मदतीचा हात दिला. त्यांनी दिलेल्या मदतीवर सागरने शुल्कातील काही रक्कम भरली आहे. उर्वरित रकमेसाठी त्याला आणखी मदतीची गरज आहे. परिस्थितीसमोर हतबल न होता, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शिक्षण घेवून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या सागरला दानशूरांनी मदतीचा हात दिल्यास त्याचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. (प्रतिनिधी)