शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सागर बगाडे यांनी रंगकर्मींसाठी घातला ‘गोंधळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST

कोल्हापूर : गोंधळ, गणेश गीतांवर नृत्य, गायन या कला सादरीकरणातून कोल्हापुरातील रंगकर्मींनी कलाकारांच्या व्यथा मायबाप रसिकांसमारे मांडल्या. मिरजकर ...

कोल्हापूर : गोंधळ, गणेश गीतांवर नृत्य, गायन या कला सादरीकरणातून कोल्हापुरातील रंगकर्मींनी कलाकारांच्या व्यथा मायबाप रसिकांसमारे मांडल्या. मिरजकर तिकटी येथे झालेल्या या अभिनव आंदाेलनाला आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट दिली व सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी मिळावी यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

राज्य शासनाने ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृहांना परवानगी दिली आहे; मात्र सध्या सणांचा कालावधी असल्याने या काळात छोटेखानी कार्यक्रमांना परवानगी मिळावी, अशी कलाकारांची मागणी आहे. यासाठी कोल्हापूर रंगकर्मींच्यावतीने शहरातील विविध चौकांमध्ये कलाबाजार माध्यमातून कलांचे सादरीकरण सुरू आहे. कलाकारांच्या मदतीसाठी मदतफेरीही काढली जात आहे. याअंतर्गत शनिवारी सकाळी ११ वाजता मिरजकर तिकटी येथे कलाकारांनी गोंधळ घातला. श्रद्धा शुक्ल आणि सागर बगाडे यांनी गोंधळ नृत्य केले. भर पावसात या कलाकारांनी आपली कला सादर केली. संभाजीनगर येथील संभाजीनगर तरुण मंडळाच्या गणपतीसमोर साकडे घातले. यात झंकार सुतार, रवी सुतार, महेश सोनुले, वेदा सोनुले, सूरज नाईक, दिनेश माळी, नितीन सोनटक्के, मंजिरी दोडन्नावर, रणजित बुगले यांनी गीते गायली. त्यांना भार्गव कांबळे, गौतम राजहंस, अनिकेत ससाणे यांनी साथसंगत केली. मुकुंद सुतार, सुनील घोरपडे, प्रसाद जमदग्नी, धनंजय पाटील, रोहन घोरपडे, मनोज जोशी, समीर भोरे, अजय खाडे यांनी नियोजन केले. श्रीधर जाधव, रमेश सुतार, शेखर गुळवणी यांनी ध्वनी व्यवस्था केली.

आज कुठे कलाबाजार

आज रविवारी सकाळी ११ वाजता मध्यवर्ती एस. टी. स्टँड, व दुपारी साडेबारा वाजता भगवा चौक, कसबा बावडा, येथे सांस्कृतिक कला बाजार भरणार आहे. तृतीयपंथी संघटनेच्यावतीने मयुरी यांनी पाठिंबा देत कलाकारांना मोर्चा काढावा लागला, तर त्याचे नेतृत्व आम्ही तृतीयपंथी करू, असे आश्वासन दिले.

---

फोटो नं ११०९२०२१-कोल-कलाबाजार

ओळ : कोल्हापूर रंगकर्मींच्यावतीने सुरू असलेल्या ‘कलाबाजार’ या अभिनव आंदोलनात शनिवारी मिरजकर तिकटी येथे सागर बगाडे यांनी गोंधळ नृत्य सादर केले. त्यास लोकांनी प्रतिसाद दिला. (छाया : आदित्य वेल्हाळ)

----