शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भगवे, निळे झेंडे एकत्र फडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:55 IST

गांधीनगर : भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन न भरून निघण्यासारखी सामाजिक आणि आर्थिक हानी झाली. तसेच एकमेकांबद्दल मतभेद निर्माण झाले. हेच मतभेद दूर करण्यासाठी गांधीनगर (ता. करवीर) येथील शिवभक्त आणि भीमभक्तांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची जयंती त्या-त्या दिवशी साजरी ...

गांधीनगर : भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन न भरून निघण्यासारखी सामाजिक आणि आर्थिक हानी झाली. तसेच एकमेकांबद्दल मतभेद निर्माण झाले. हेच मतभेद दूर करण्यासाठी गांधीनगर (ता. करवीर) येथील शिवभक्त आणि भीमभक्तांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची जयंती त्या-त्या दिवशी साजरी करून मिरवणूक मात्र २० एप्रिलला एकत्रित काढण्याचा निर्णय घेतला आहे.भीमा-कोरेगाव या प्रकरणानंतर दोन्ही समाजातील मतभेद वाढले आणि दोन्ही समाजाचे न भरून निघणारे नुकसान झाले. जयंती साजरी करण्याचा चंग बांधलेले भीमसैनिक आणि शिवभक्त मिरवणुकीची परवानगी मागण्यासाठी गांधीनगर पोलीस ठाण्यात गेले असता येथील स.पो.नि. सुशांत चव्हाण यांनी शिवभक्त आणि भीमभक्तांची एकत्र बैठक बोलावून रयतेचे राजे शिवछत्रपती आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रयतेबाबतचे कार्य अलौकिक आहे. त्यांचा देशभरातील प्रत्येक नागरिकांनी सन्मान केला पाहिजे. या महामानवांची वैचारिकता प्रत्येकाने अंगिकारली तर समाजामधील निर्माण होणारे तेढ थांबेल आणि समाजा-समाजामध्ये सामाजिक बांधीलकी, आपुलकी रुजेल, असे सांगितले. त्या दरम्यान शिवभक्त आणि भीमभक्तांनी येणाऱ्या दोन्ही महामानवांच्या जयंती या पारंपरिक पद्धतीने साजºया करून मिरवणूक मात्र २० एप्रिलला एकत्रित काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे जातीय तेढ कमी होऊन समाज प्रबोधनांचा संदेश जाऊन सलोख्याचे वातावरण तयार होण्यास मदत होईल. गांधीनगरचेस. पो. नि. सुशांत चव्हाण यांनी केलेल्या आवाहनाला येथील शिवभक्त आणि भीमभक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन इतर गावांतील महामानवांच्या अनुयानांनाही विचार करायला लावणारे पाऊल टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.बैठकीला जितेंद्र कुबडे, लखन कांबळे यांनी या महामानवांच्या जयंती ज्या-त्या दिवशी प्रतिमापूजन करून मिरवणूक मात्र २० एप्रिलला पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. बैठकीत ग्रा. पं. सदस्य विक्रम मोहिते, अनिल उपाध्ये, बाबासाहेब नेर्ले, भटक्या विमुक्त गोसावी समाजाचे अध्यक्ष उत्तम जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी धर्मेंद्र जाधव, गणेश सरवदे, अभिजित अवघडे, विजय मनचुडिया, नितीन धनवडे, हरीष पोवार, पप्पू श्ािंदे, राजा इनामदार, विकी बेनाडे, विशाल फुले, रोशन निरंकारी, विवेक कोलप यांच्यासह विविध मंडळांनी मिरवणुकीस पाठिंबा दर्शविला आहे.