शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

‘सदरा’फेक आंदोलन

By admin | Updated: November 5, 2015 23:57 IST

स्वाभिमानी संघटना : प्रवासी वाहतुकीविरोधातील ‘आरटीओ’ने कारवाई रोखावी

कोल्हापूर : गेल्या शुक्रवारपासून हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर ‘आरटीओ’कडून कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक व्यवसाय करणारे बहुतांशी सुशिक्षित बेरोजगार असून, नोकरी नसल्याने या व्यवसायात आले आहेत. यासह मंदी आणि दुष्काळी परिस्थिती यांचा विचार करून प्रादेशिक परिवहनने सुरू केलेली कारवाई रोखावी, या मागणीसाठी गुरुवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ‘सदरा’फेक आंदोलन केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आलेल्या या आंदोलनात संघटनेचे कार्यकर्ते महेश कांदेकर यांनी वाहतूक व्यावसायिकांविरोधात सुरू केलेली ही कारवाईची मोहीम मंदी, दुष्काळ आणि बेरोजगारी यांचा विचार करून बंद करावी, अशी मागणी करीत स्वत:च्या अंगातील ‘सदरा’ काढून थेट प्रादेशिक परिवहन अधिकारी दराडे यांच्या दिशेने फेकला. निवेदन देण्यासाठी आलेल्या या कार्यकर्त्यांकडून अचानक असा प्रयत्न झाल्यानंतर अधिकारी व कर्मचारी वर्ग काहीकाळ थबकले. पुन्हा ‘स्वाभिमानी’चे जिल्हाअध्यक्ष भगवान काटे यांनी ऐन दिवाळीत अशा पद्धतीची वाहतूक व्यावसायिकांवर कारवाई करीत गोरगरिबांच्या तोंडातील घास काढून घेण्याचे काम आपल्या कार्यालयाने करू नये. याचबरोबर जे वाहतूक व्यावसायिक कायद्याच्या चौकटीत राहून वाहतूक करणार नाहीत, अशा कार्यकर्त्यांवर कारवाई केली, तर आमची काहीही हरकत नाही. मात्र, सरसकट सर्वांवर ही कारवाई करू नये. ही कारवाई त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी काटे यांनी लावून धरली. ही कारवाई त्वरित बंद करावी, अन्यथा सोमवार (दि. ९)पासून अचानक रास्ता रोको यासारखे तीव्र आंदोलन करण्याचा विचार करू. यावेळी कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार सकारात्मक करून ही बाब परिवहन आयुक्तालयापर्यंत पोहोचवू किंवा शक्य झाल्यास ही कारवाई दिवाळी सणापुरती तरी पुढे ढकलू, असे आश्वासन दराडे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. यावेळी शैलेश चौगुले, राजू पवार, आनंदराव कुदळे, जितेंद्र कटकोळे, बालेखान मुल्ला, राजू माढकर, दस्तगीर शेटके, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.