शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सडोलीत आजी, माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सडोली (खालसा) : येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू होत्या; परंतु जागावाटपाचा तिढा न ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सडोली (खालसा) : येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू होत्या; परंतु जागावाटपाचा तिढा न सुटल्याने कॉग्रेस विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष विरुद्ध भाजप अशी तिरंगी लढत होत आहे. या लढतीत आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, स्वरूपसिंह पवार-पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सडोली (खालसा) ता. करवीर येथील ग्रामपंचायतीची शेतकरी कामगार पक्षाची २५ वर्षांची सत्ता गेल्या निवडणुकीत कॉग्रेसने आठ जागा जिंकून संपुष्टात आणली होती. त्यावेळी शेकापला पाच जागांवर समाधान मानावे लागले होते. आमदार पी. एन. पाटील यांचे भाचे व माजी आमदार संपतराव पवार पाटील यांचे चुलत बंधू असलेले स्वरूपसिंह पवार-पाटील यांनी शेकापपासून फारकत घेत सवता सुभा मांडला आहे. विधानसभा निवडणुकीत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तडजोड करून त्यांनी कॉग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विधानसभेला पी. एन. पाटील यांच्या विजयासाठी एकोपा निर्माण झाला होता, तसा ग्रामपंचायत निवडणुकीतही राहावा व गावच्या विकास व्हावा यासाठी उद्योगपती रवी पाटील, ‘गोकुळ’चे संचालक उदय पाटील, पंकज पवार-पाटील, समर पवार, क्रांती पवार, अक्षय पवार यांनी दोन्ही गटांशी प्राथमिक चर्चा करून बैठकाही झाल्या; परंतु तिन्ही गटांत जागावाटपावरून एकमत न झाल्याने तिरंगी निवडणूक होत आहे. आजी-माजी आमदारांसह स्वरूपसिंह पवार-पाटील याची राजकीय वर्चस्वासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीकडे भोगावती खोऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे.