शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

साधना कांबळेंच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: May 29, 2014 01:11 IST

विजय सूर्यवंशी : प्रस्ताव अपंग कल्याण आयुक्तालयाकडे पुण्याला पाठविणार

विजय सूर्यवंशी : प्रस्ताव अपंग कल्याण आयुक्तालयाकडे पुण्याला पाठविणार कोल्हापूर : कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक कार्यालयात दोन महिन्यांपूर्वी सापडलेल्या अपंगांच्या बनावट ओळखपत्रांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी सखोल चौकशी करून जि. प. समाजकल्याण विभागातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता साधना कांबळे यांची अपंग कल्याण आयुक्तालय यांच्यामार्फत खातेनिहाय चौकशी करण्याचा प्रस्ताव अपंग कल्याण आयुक्तालय पुणे यांना पाठविण्याचे आदेश दिले आहेत. मध्यवर्ती बसस्थानक येथे सापडलेल्या बनावट अपंगाच्या ओळखपत्रावर समाजकल्याण अधिकार्‍यांच्या सह्या खर्‍या असून, ही ओळखपत्रे जिल्हा परिषद समाजकल्याण अपंग विभागातून चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. विशेष म्हणजे या दोन्ही व्यक्तींची ‘अपंग’ म्हणून नोंदही या कार्यालयाकडे प्रथम करण्यात आली. तसेच नोंदवहीत दोन्ही नावांच्या पुढे खाडाखोड करून फोटोही काढून टाकण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने ही ओळखपत्रे ‘त्या’ व्यक्तीने परस्पर चोरी केली की कार्यालयातीलच काही व्यक्तींना हाताशी धरून ही बाहेर काढली, या प्रकाराची सखोल चौकशी होण्यासाठी ‘लोकमत’ने पाठपुरावा केला होता. या गंभीर घटनेची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील रजिस्टर जिल्हा समाजकल्याण अधिकारी ताब्यात घेऊन बनावट दाखले देण्याच्या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी दिनेश डोके यांच्याकडे सादर केला होता.