शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘सदिच्छादूत राही, विरधवल ’ मतदानापासून दुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 16:21 IST

लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जनजागृती करण्यासाठी सदिच्छादूत म्हणून निवडणूक आयोग व शासनातर्फे नियुक्ती केली होती. सदिच्छादूत म्हणून निवड केलेल्या कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत, जलतरणपटू वीरधवल खाडे या दोघांनीही मतदान केले नसल्याचे स्पष्ट झाले. यात परदेश दौरा व सरावाचे कारण दोघांनीही दिले आहे.

ठळक मुद्दे‘सदिच्छादूत राही, विरधवल ’ मतदानापासून दुरराही चीन दौऱ्यावर, तर वीरधवल बंगलोरमध्ये सरावात मग्न

कोल्हापूर : लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जनजागृती करण्यासाठी सदिच्छादूत म्हणून निवडणूक आयोग व शासनातर्फे नियुक्ती केली होती. सदिच्छादूत म्हणून निवड केलेल्या कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत, जलतरणपटू वीरधवल खाडे या दोघांनीही मतदान केले नसल्याचे स्पष्ट झाले. यात परदेश दौरा व सरावाचे कारण दोघांनीही दिले आहे.समाज माध्यमे, मुद्रीत माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे या माध्यमाबरोबरच विविध जाहीरात फलक,भित्तीपत्रक याद्वारे सदिच्छादूत लोकशाही सृदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करीत होते. मात्र, कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत ही चीन येथे २१ ते २९ एप्रिल दरम्यान होणाऱ्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेसाठी गेली आहे. त्यामुळे तिला मतदानाचा पवित्र हक्क बजावता आला नाही. 

आॅलंपियन जलतरणपटू विरधवल खाडे हाही बंगलोर येथे आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेची तयारी करीत असून त्याला मतदान करण्यासाठी त्याचा प्रशिक्षकांनी सुट्टी दिली नाही. त्यामुळे दोन्ही सदिच्छादूतांना स्वत:ला मतदानाचा हक्क बजावता आला नाही.या दोघांबरोबर सदिच्छादृत म्हणून निवड झालेले अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, निशिगंधा वाड, उषा जाधव, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना , महिला धावपटू ललिता बाबर, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, दिव्यांग कार्यकर्ता निलेशसिंग यांनीही मतदानाचा पवित्र हक्क बजावला. विशेष म्हणजे मागील २०१४ च्या निवडणूकीत राही व वीरधवल यांची सदिच्छादूत म्हणून निवड झाली होती. यंदा निवड होवूनही त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. 

चीन येथे २१ ते २९ एप्रिल दरम्यान सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेसाठी ती यापुर्वीच रवाना झाली आहे. त्यामुळे तिला सदिच्छादूत असूनही मतदानाचा पवित्र हक्क बजावता आला नाही.- जीवन सरनोबत, राहीचे वडील

बंगलोर येथे आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेची वीरधवल जय्यत तयारी करीत आहे. तेथे त्याला प्रशिक्षकांनी मतदान करण्यासाठी परवानगी नाकारल्याने तो कोल्हापूरात मतदानासाठी येवू शकला नाही.-विक्रमसिंह खाडे, वीरधवलचे वडील 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर