शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊंची हजेरीही ठरली चर्चेची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2017 23:18 IST

कवलापुरात भाजपची सभा : भगवा कुर्ता, कमळाच्या मफलरने आणखी संशयकल्लोळ

सांगली : भाजपच्या कवलापूर (ता. मिरज) येथील प्रचार सभेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हजेरी लावली आणि ती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. भगवा कुर्ता, गळ्यात भाजपचा मफलर आणि कपाळाला कुुंकूमतिलक अशा वेशभूषेतील त्यांच्या कवलापुरातील उपस्थितीने सभास्थळी नवा संशयकल्लोळ निर्माण झाला. भाजपशी सलगीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यात सध्या मतभिन्नता दिसून येत आहे. त्याबद्दल दोन्हीही नेत्यांनी परस्परविरोधी विधाने केल्यामुळे गेले काही दिवस दोघे चर्चेत आहेत. राजू शेट्टी यांनी भाजपच्या कोणत्याही जाहीर सभांना हजेरी लावलेली नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ते भाजपच्या नेत्यांपासून दूर दिसत आहेत, तर दुसरीकडे मंत्री खोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला लावून भाजपच्या सभांना हजेरी लावत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गुरुवारच्या सभेसाठी दोघांनाही निमंत्रण देण्यात आले होते, मात्र शेट्टी उपस्थित राहिले नाहीत. खोत यांनी मात्र यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे फडणवीस यांच्या सभेला हजेरी लावली. मुख्यमंत्री येण्यापूर्वीच पंधरा मिनिटे अगोदर खोत यांचे सभास्थानी आगमन झाले. नेहमीचाच पोषाख असला तरी, त्यांनी भगव्या रंगाचा कुर्ता घातल्यामुळे उपस्थितांमध्ये कुजबूज सुरू झाली. त्यानंतर बराच वेळ ते शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्याशी चर्चा करीत होते. मुख्यमंत्री आल्यानंतर ते त्यांच्याशी चर्चा करू लागले. मुख्यमंत्रीही वारंवार त्यांचा हात हातात घेऊन दिलासा दिल्यासारखे करीत होते. नेत्यांच्या भाषणांपेक्षा उपस्थितांचे लक्ष याच गोष्टीकडे लागले होते. सभेनंतर पत्रकारांनी खोत यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी नकार दर्शविला. (प्रतिनिधी)दोन्ही दादा हसले... व्यासपीठावरील सर्व नेत्यांना मफलरचे वाटप करण्यात येत होते. त्यावेळी फडणवीस आणि खोत यांच्याशिवाय सर्वांना मफलर देण्यात आला. या दोघांना मफलर द्यायचा का?, अशा प्रश्नांकित चेहऱ्याने संबंधित कार्यकर्त्याने चंद्रकांतदादा पाटील आणि आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्याकडे पाहिले. त्यांनी मफलर देण्यासाठी खुणावले. कार्यकर्त्याने फडणवीस व खोत यांच्या गळ्यात मफलर घातला. त्यावेळी दोन्ही दादांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. त्यांचे हास्य पाहून अन्य कार्यकर्त्यांचे लक्षही मफलर घातलेल्या सदाभाऊंकडे गेले. शेवटी ही गोष्ट सदाभाऊंच्या लक्षात आली आणि त्यांनी लक्षवेधी ठरलेला मफलर गळ्यातून बाजूला केला.