गोवा येथे दि. १६ जुलै ते १९ जुलै रोजी सेव्हन साइड फुटबॉल फेडरेशन यांनी या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
या स्पर्धेत गोवा, मुंबई, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश येथून संघ आले होते. या स्पर्धेत साखळी स्पर्धेतून अव्वल दोन संघ अंतिम सामन्यात दाखल झाले.
अंतिम सामना कोल्हापूर विरुद्ध गोवा यांच्यात झाला. हा सामना कोल्हापूरच्या एस थ्री संघाने एकतर्फी ७/० ने जिंकून स्पर्धेवर नाव कोरले.
कोल्हापूरकडून अंजलीने २ गोल तर निदा सतारमेकर ३,सौम्या कागले २ असे गोल झाले
संघास रोख रक्कम आणि मेडल, ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
संघाकडून अंजली,आजगावकर, धनश्री गवळी, सौम्या कागले, निदा सतारमेकर, दिव्या माने, सानिका भोसले, प्रत्युशा नलवडे, प्राची पाटील, हिमानी परब यांनी उत्तम कामगिरी केली. विजेत्या संघास प्रशिक्षक निखिल सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.
२३ थ्री सॉकर फुटबॉल