शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

एस. के. रोलरच्या स्केटर्सची लिम्का रेकॉर्ड बुकात नोंद

By admin | Updated: June 5, 2015 00:13 IST

१२१ तासांचा विक्रम : ३ हजार १५० कि.मी. अंतर पूर्ण

कोल्हापूर : बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंगच्या वतीने आयोजित उपक्रमात स्केटर्सनी सलग १२१ तास स्केटिंग करून नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याची नोंद ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये घेण्यात आली. या विक्रमात कोल्हापुरातील एस. के. रोलर स्केटिंगच्या ५० स्केटर्सनी सहभाग घेतला होता. बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंगच्या रिंगवर घेण्यात आलेल्या या उपक्रमात बेळगावसह कोल्हापुरातील २०० स्केटर्सनी सहभाग घेतला. हा विक्रम नोंदविण्यासाठी हरियाणा, पंजाब, बंगलोर, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, आदी भागांतून स्पर्धक आले होते. हा उपक्रम २९ मे ते ३ जून या कालावधीत घेण्यात आला. यामध्ये १५७५३ लॅप्स मारीत स्केटर्सनी ३ हजार १५० किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. या विक्रमाची नोंद ‘लिम्का’सह इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड, एशिया बुक आॅफ रेकॉर्ड, युनिक बुक आॅफ रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडिया, इंडियन अचिव्हर्स बुक आॅफ रेकॉर्ड यामध्ये घेण्यात आली. स्पर्धेचा बक्षीस समारंभ कर्नाटकचे क्रीडामंत्री अभयचंद्र जैन यांच्या हस्ते झाला. यावेळी नितीन भंडारी, शिरीष पाटील, ए. डी. शर्मा, सुहास कारेकर, रमेश चिंडक, ज्योती चिंडक, आदी उपस्थित होते. दरम्यान, या उपक्रमात सचिन टीम टॉपर रोलर स्केटिंगच्या आदित्य कुलकर्णी (वय ४), अर्र्पित गरग (८) या स्केटर्सनीही या विक्रमात सहभाग नोंदविला. त्यांना प्रशिक्षक सचिन इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले.