शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘एस. टी.’चे शासनात विलिनीकरण करा, अन्यथा तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:19 IST

कोल्हापूर : कोरोनामुळे एस. टी. महामंडळाची आर्थिक स्थिती कमकुवत बनली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची वेतनवाढ अशक्य आहे. त्यावर कायमस्वरूपी ...

कोल्हापूर : कोरोनामुळे एस. टी. महामंडळाची आर्थिक स्थिती कमकुवत बनली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची वेतनवाढ अशक्य आहे. त्यावर कायमस्वरूपी पर्याय म्हणून या महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, अशी संघटनेची मागणी आहे. विलिनीकरणाचा निर्णय लवकर घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी शुक्रवारी दिला.

महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस संघटनेच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते. विलिनीकरणाचा प्रयोग इतर राज्यात यशस्वी झाला असून, आपल्या राज्यात तो होण्यासाठी परिवहन राज्य मंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनी प्रयत्न करावेत. एस. टी.तील काही काँग्रेसच्या संघटना स्वार्थासाठी सरकार विरोधात असंतोष पसरवत आहेत. त्यांच्यावर पक्षाने कठोर कारवाई करण्याची मागणी बरगे यांनी केली. एस. टी.ला उर्जितावस्थेत आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कर्मचारी संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले. या मेळाव्यात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते बी. डी. शिंदे, राजेंद्र पाटील, मियालाल पटवेगार, हिंदुराव कुंभार, संजय कांबळे, ए. बी. माने, संजय पोवार-वाईकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते बबनराव थोरात, ए. आर. पाटील, परवीन पठाण, बी. आर. साळोखे, सुनील फल्ले, एस. वाय. पोवार, अय्याज चौगुले, ए. ए. गवंडी, अनिता पाटील, वैशाली पिंगळे, गजानन विचारे आदी उपस्थित होते. संघटनेचे विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर यांनी प्रास्तविक केले. रावण समुद्रे यांनी सूत्रसंचालन केले. संजय सासने यांनी आभार मानले.

श्रीरंग बरगे म्हणाले की, महामंडळाचा संचित तोटा सध्या साडेसहा हजार कोटी आहे. महामंडळ उर्जितावस्थेत आणण्यासाठी परिवहन राज्य मंत्री सतेज पाटील आणि महामंडळाचे एमडी. शेखर चन्ने यांचे नियोजनबद्ध काम असून, मंत्री पाटील व एमडी चन्ने यांना विभागीय अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे.

चौकट

‘कागल’च्या व्यवस्थापकांवर कारवाई करा

लॉकडाऊनमध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा कागल आगार व्यवस्थापकांनी निरोप समारंभ केला नाही. त्यांच्यावर कारवाईची मागणी चिकुर्डेकर यांनी केली. जे आगार व्यवस्थापक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निरोप समारंभ करीत नाहीत. त्यांची निश्चितच दखल घेतली जाईल. कामगारांना न्याय मिळवून दिला जाईल, असे आमदार जाधव यांनी सांगितले.