कोल्हापूर : एस. के. माळी यांनी तब्बल २५ वर्ष सरचिटणीस पदाच्या माध्यमातून काॅंग्रेस पक्षाला दिलेले योगदान विद्यमान पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे. एक सच्चा काँग्रेसप्रेमी आणि कोणत्याही पदाची अपेक्षा न करता, सदैव काँग्रेस पक्षाचा एक ध्येयवेडा कार्यकर्ता म्हणून ते कायम स्मरणात राहतील, असा हुंकार जिल्हा काॅंग्रेस कमिटीतर्फे आयोजित शोकसभेत उमटला.
एस. के. माळी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी काॅंग्रेस कमिटीत शोकसभा आयोजित केली होती. यावेळी सर्वांनीच माळी यांच्या योगदानाची दखल घेताना त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. शहराध्यक्ष संध्या घोटणे, किशोर खानविलकर, महम्मदशरीफ शेख, संपतराव चव्हाण - पाटील, सुलोचना नायकवडी, प्रदीप चव्हाण, ए. डी. गजगेश्वर, संजय पोवार वाईकर, विजयसिंह माने, लीला धुमाळ, वैशाली पाडेकर, प्रदीप शेलार, यशवंत थोरवत, नारायण लोहार, सुभाष देसाई, बाळासाहेब जगदाळे, आनंदराव पाटील, शुभांगी साखरे, हेमलता माने, प्रमोद बुलबुले, रणजित पवार, संग्राम गायकवाड, विक्रम जरग, अन्वर शेख, निशिकांत दिवाण, अमर देसाई, सर्फराज रिकिबदार, विजयानंद पोळ, उज्ज्वला चौगुले, प्रवेश सय्यद, विश्वास नांगरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो: २१०१२०२१-कोल-काॅंग्रेस माळी
फोटो ओळ : काॅंग्रेस कमिटीत गुरुवारी दुपारी सरचिटणीस एस. के. माळी यांच्या निधनानिमित्त शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी काॅंग्रेसजनांनी भावना व्यक्त केल्या.