शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

हिरण्यकेशीत कपडे..चप्पल ओढ्यात! आरोपीकडून कपड्यांचीही विल्हेवाट भडगाव शिक्षक खून प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 01:27 IST

गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंंग्लज) येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या खून प्रकरणातील आरोपी सुरेश चोथे याने खुनाच्या घटनेनंतर आपल्या अंगावरील रक्ताने माखलेले जर्कीन व शर्ट भडगाव पुलानजीक हिरण्यकेशी नदीत,

गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंंग्लज) येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या खून प्रकरणातील आरोपी सुरेश चोथे याने खुनाच्या घटनेनंतर आपल्या अंगावरील रक्ताने माखलेले जर्कीन व शर्ट भडगाव पुलानजीक हिरण्यकेशी नदीत, तर आपल्या कमरेचा बेल्ट व चप्पल कडगाव रोडवरील ओढ्यात टाकल्याची माहिती पोलिसांना चौकशीत दिली. त्यामुळे आरोपीच्या कपडे, बेल्ट व चप्पलच्या शोधार्थ सावंतवाडी पोलिसांचे पथक सोमवारी आरोपीसह गडहिंग्लजला आले होते.

सकाळी ११च्या सुमारास सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या नेतृत्वाखाली पथक गडहिंग्लजला आले. त्यांनी येथील नगरपालिकेकडील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडील कर्मचाºयांच्या सहकार्याने यांत्रिक बोटीने भडगाव पुलाच्या दोन्ही बाजूस ‘सुरेश’च्या कपड्यांचा शोध घेतला. तसेच कडगाव रोडवरील ओढ्यावर जाऊन चप्पल व बेल्टची शोधाशोध केली. तब्बल तासभर ही शोधमोहीम सुरू होती. मात्र, यापैकी एकही वस्तू त्यांच्या हाती लागली नाही.

६ नोव्हेंबरला रात्री ११ च्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झालेल्या विजयकुमार गुरव यांचा खून त्यांच्याच घरातील बेडरूममध्ये केल्याची कबुली आरोपी सुरेश चोथे व विजयकुमारची पत्नी जयलक्ष्मी हिने अटकेनंतर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना घटनास्थळी आणून रीतसर पंचनामाही केला.दरम्यान, आरोपीने मृतदेहासोबत कावळेसादच्या दरीत टाकलेली गादी व उशी पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपी सुरेश याने घटनेच्या दिवशी वापरलेल्या वस्तू नदी व ओढ्यात फेकून दिल्याची माहिती दिली होती. त्यानुसार ‘त्या’ वस्तू हस्तगत करण्यासाठी सावंतवाडी पोलीस गडहिंग्लजला आले होते.गादी, ‘उशी’, ‘रॉड’ अन् गाडी हस्तगत!मृत विजयकुमार गुरव हे त्या दिवशी ज्या गादीवर झोपले होते, त्याच गादीवर ‘उशी’ने तोंड दाबून त्यांच्या डोक्यावर लोखंडी ‘रॉड’ने अनेक प्रहार करून खून केल्याचे आणि मृतदेहासोबत ‘ती’ ‘गादी व उशी’देखील कावळेसादच्या दरीत फेकून दिल्याचे आरोपी सुरेशने पोलिसांना सांगितले आहे. सुमारे दोन हजार फूट खोल दरीतून ‘ती’ गादी व उशी पोलिसांनी हस्तगत केली असून, दोन्ही वस्तू रक्ताने भिजल्या आहेत. खुनासाठी वापरलेला ‘रॉड’ आणि मृतदेह टाकण्यासाठी वापरलेली गाडी पोलिसांनी हस्तगत केली आहे.