शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:18 IST

बाचणी : शाळांमध्ये दिला जाणारा शालेय पोषण आहाराचा पुरवठा धिम्या गतीने होत आहे. त्यामुळे शाळा सुरू होऊन अठरा दिवस झाले तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी या आहारापासून वंचित आहेत. पुरवठा करणाऱ्या ठेकेदार बदलाचा हा परिणाम असल्याचे प्रशासन सांगत असले, तरी शाळा पातळीवरही या आहाराची सोय करण्यात आली नाही.या आहारासाठी जिल्ह्याला महिन्याला ...

बाचणी : शाळांमध्ये दिला जाणारा शालेय पोषण आहाराचा पुरवठा धिम्या गतीने होत आहे. त्यामुळे शाळा सुरू होऊन अठरा दिवस झाले तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी या आहारापासून वंचित आहेत. पुरवठा करणाऱ्या ठेकेदार बदलाचा हा परिणाम असल्याचे प्रशासन सांगत असले, तरी शाळा पातळीवरही या आहाराची सोय करण्यात आली नाही.या आहारासाठी जिल्ह्याला महिन्याला सुमारे २००० ते २१५० टन इतके धान्य लागत असून, आतापर्यंत केवळ ८०० टनच पुरवठा झाला आहे. यातही शहरात ५००, तर ग्रामीण भागात केवळ २५० टन धान्य पुरवठा झाला आहे.राज्यातील सर्व शाळांना पोषण आहारासाठी धान्य पुरवठ्याचा ठेका कंझ्युमर फेडरेशन कंपनीला देण्यात आला आहे. १५ जूनला शाळा सुरू झाली असून, आजपर्यंत ग्रामीण भगातील बहुतांशी शाळांत हा धान्य पुरवठा झालेला नाही. विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहेत. ठेकेदाराच्या धान्य पुरवठ्याच्या धिम्या गतीमुळे पुरवठा होण्यास अजून किती दिवस लागतील हे मात्र प्रशासनातील कोणताच अधिकारी खात्रीशीर सांगत नाही. त्यामुळे पोषण आहाराचे धान्य शाळेत वेळेत पोहोचण्यावर प्रशासनातील कोणाचेही नियंत्रण नाही .दरम्यान, धान्य पोहोचले नाही म्हणून संबंधित शाळांतील मुख्याध्यापक, प्रभारी मुख्याध्यापकांनी मात्र याची कसलीच तजवीज केलेली दिसत नाही. कारण कोणत्याच शाळेने अखंडितपणे आहार दिलेला नाही. याकडे शिक्षण विभागानेही गांभीर्याने पाहिले नाही.शिक्षक बदलीने नियोजनाचे तीनतेरागत महिन्यात शिक्षक बदलीची प्रक्रिया पूर्ण झाली, पण त्यातील वाद मात्र अजूनही प्रलंबित आहेत. चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार असून, याकडेच सर्व शिक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. या गोंधळात विद्यार्थ्यांना आहार देण्याचे मात्र कुणीच नियोजन केले नसल्याने त्याचा फटका ग्र्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत आहे. प्रशासनही याबाबत गंभीर नाही.