शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजप’च्या शहरासह ग्रामीण अध्यक्षांच्या निवडी

By admin | Updated: January 13, 2016 01:09 IST

संघटनात्मक नेमणूक : शहरातील सात, तर ग्रामीणच्या चौदा विभागांचा समावेश

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षामध्ये संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी शहरातील सात तर चौदा ग्रामीण मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर झाल्या. निवडीचे पत्र महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते देण्यात आली. पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणून चार दिवसांपूर्वी शहरातील ८१ प्रभागातील प्रभाग अध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या होत्या. त्यानंतर मंडल अध्यक्षांच्या निवडी केल्या. जिल्हा निवडणूक अधिकारी कांताताई नलवडे यांच्या मान्यतेने पक्षाच्या जिल्हा कार्यालयात महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी सात प्रमुख मंडल अध्यक्ष व सरचिटणीस यांच्या निवडीची घोषणा केली. मंडल निरीक्षक म्हणून अशोक कोळवणकर, अशोक देसाई, सयाजी आळवेकर, हेमंत आराध्ये, मधुमती पावनगडकर, गणेश देसाई, हर्षद कुंभोजकर यांनी काम पाहिले. यावेळी सरचिटणीस अशोक देसाई, सदानंद कोरगावकर, संतोष भिवटे, संदीप देसाई, गणेश देसाई, अमोल पालोजी, आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, प्रभा टिपुगडे, हेमंत आराध्ये, आदी उपस्थित होते. निवड झालेले पदाधिकारी असे, (मंडल , अध्यक्ष, सरचिटणीस या क्रमाने ) मंगळवार पेठ : संतोष माळी, गणेश चिले. शिवाजी पेठ : प्रदीप पंडे, ओंकार जोशी. लक्ष्मीपुरी : विवेक कुलकर्णी. शाहूपुरी : आशिष कपडेकर, ऋषिकेश मुदगल. उत्तरेश्वर पेठ : सतीश पाटील, विरेंद्र मठपती. राजारामपुरी : संग्रामसिंह निंबाळकर, गणेश पसारे. कसबा बावडा : डॉ. सदानंद राजवर्धन, सतीश कांबळे .दरम्यान, जिल्ह्णातील चौदा ग्रामीण मंडल अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पक्षाने पूर्ण केली. ही निवडणूक प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी वासुदेव काळे, साहाय्यक निवडणूक अधिकारी शिवाजी बुवा यांच्या मार्गदर्शनखाली पार पडली.यात निवड झालेले मंडल अध्यक्ष असे : धैर्यशील देसाई (शिरोळ), पी. डी. पाटील (हातकणंगले), सुरेश बेनाडे (पन्हाळा), दीपक शिरगावकर (राधानगरी), परशुराम तावरे (कागल), वसंत जिवबा पाटील (करवीर), नामदेव विष्णू पाटील (चंदगड), नाथाजी पाटील (भुदरगड), हेमंत कालेकर (गडहिंग्लज), मिलींद भिडे (जयसिंगपूर), अरुण देसाई (आजरा), शहाजी भोसले (इचलकरंजी), संदीप पाटील (गगनबावडा), दाजी बंडू चौगले (शाहूवाडी). या प्रक्रियेसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, संघटन महामंत्री बाबा देसाई यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती शंतनू मोहिते यांनी पत्रकाद्वारे दिली. (प्रतिनिधी)