शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयाला अखेर स्त्रीरोगतज्ज्ञ मिळाला

By admin | Updated: February 9, 2015 00:37 IST

‘लोकमत’चे कौतुक : स्वाभिमानी संघटनेच्या मागणीला यश

मुरगूड : मुरगूड शहरासह परिसरातील पन्नासहून अधिक गावांना नवसंजीवनी देणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात स्त्री- रोगतज्ज्ञ नसल्याने महिलांची कुचंबणा होत होती. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पातळीवर संपर्क साधून जर डॉक्टर आले नाहीत, तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर नवीनच हजर झालेले स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मुकुंद सादिलगे यांचे संघटनेच्या वतीने स्वागत केले. ग्रामीण भागातील महिलांची गैरसोय दूर झाल्याने रुग्णांमधूनही समाधानाची भावना व्यक्त होत आहे.मुरगूड येथील ग्रामीण रुग्णालय अत्याधुनिक वैद्यकीय सेवासुविधा देऊ लागल्याने येथे आठवड्यातील सर्वच दिवशी गर्दी असते. स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने महिलांची कुचंबणा होत होती. विशेषत: गरोदर स्त्रियांना खासगी रुग्णालयाचाच आधार घ्यावा लागत होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. व्ही. पी. देशमुख यांच्याकडे मागणीचे निवेदन दिले होते. या मागणीला अखेर न्याय मिळाला. आज डॉ. सादिलगे रुग्णालयात रुजू झाले. कागल तालुका संघटनेचे उपाध्यक्ष नामदेव भराडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. यावेळी डॉ. अनिल तिवडे, डॉ. चित्रा पाटील, एम. के. चौगले यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी युवा संघटनेचे उपाध्यक्ष शिवाजी कळमकर, अंबाजी सावंत, रणजित पाटील, अशोक पाटील, विक्रम पाटील, रणजित मोरे, संदीप रामाणे, प्रवीण भराडे, पांडुरंग चौगले, राजू पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते. उद्योगपती डॉ. एम. एम. चौगले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)‘लोकमत’चे कौतुक ‘रुग्णालयाला स्त्रीरोगतज्ज्ञ हवा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मधून स्त्रियांच्या होणाऱ्या गैरसोयींबाबत वास्तव सडेतोड मांडले होते. त्यामुळे शेतकरी संघटनेचे नेते व पंचायत समितीचे सदस्य अजित पोवार यांनी ‘लोकमत’चे कौतुक केले.