शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

दरवाजाविना वेगात धावली

By admin | Updated: May 26, 2015 00:52 IST

महामंडळाचा निष्काळजीपणा--एस.टी.बस प्रवाशांचा जीव धोक्यात :

प्रदीप शिंदे ल्ल कोल्हापूरसध्याच्या कडक उन्हाळ्यामुळे सर्वत्र उकाडा जाणवत आहे अशातच मिरज-कोल्हापूर ही एस.टी. दरवाजाशिवाय सोमवारी धावली. चालकाशेजारील दरवाजाच गायब झाल्याने मिरजेपर्यंत चालक व प्रवाशांनी रस्त्यावरील गरम हवा खातच अंतर कापले. दरवाजा बसविण्यास मध्यवर्ती बसस्थानकातील आगार कार्यशाळेने वेळेअभावी असमर्थता दाखविल्याने प्रवासी व एस.टी. कर्मचाऱ्यांंमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्या ‘सुरक्षित प्रवास’ म्हणून एस.टी.कडे पाहिले जाते. मात्र, प्रवाशांना ऊन, वारा, पाऊस या तिन्ही संकटांचा सामना करत एस.टी.मधून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र, डेपोतील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. त्याचा प्रत्यय सोमवारी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आला. मोडकळीस आलेल्या खिडक्या, काचा नसणे, टफ हेलकावे खाणे, कर्णकर्कश आवाज येणे अशा स्थितीत अनेक गाड्या धावत असतात. नादुरुस्त स्वरूपातील गाड्या रस्त्यावर धावत असल्यामुळे येथून शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची, प्रवाशांची व नोकरदारांची मोठी गैरसोय होते. याबाबत संबंधित वरिष्ठ आगार व्यवस्थापक एस. एम. कांबळे यांच्याकडे चौकशी केली असता. असा प्रकार येथे घडला आहे का, हे पाहावे लागेल, असे सांगून या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मिरज डेपोतील एस.टी. सोमवारी कोल्हापुरात आली असता, चालकाच्या बाजूचा दरवाजा मोडून पडला. चालकाने मध्यवर्ती बसस्थानकातील आगार कार्यशाळेत जाऊन दरवाजा मोडकळीस आल्याची बाब सांगितली. मात्र, येथील कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीस वेळ लागेल, असे सांगितले. त्यावर चालकाने तशीच गाडी पुढे दामटली. कर्मचाऱ्याने या गंभीर गोष्टीकडे लक्ष दिले नाही. या प्रकारामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.बस प्रवासाचा अनुभव काही विलक्षण असाच असतो. तुटलेले बाकडे, त्यावर कुशनचा अभाव, हे एस.टी.चे नेहमीचे बनले आहे. सोमवारी असाच वेगळा अनुभव आला. एस.टी. चालकाच्या शेजारील दरवाजा नसल्याने पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याने या गाडीतून मिरजेला जाणे टाळले.- महादेव पाटील, प्रवासी.