शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

नियमात ! तरीही दहीहंडी दणक्यात

By admin | Updated: August 26, 2016 01:14 IST

वीस फुटाचा ‘थर’थराट : कोल्हापूरकरांनी अनुभवली शिस्तीची दहीहंडी; आकर्षक विद्युत रोषणाई; डीजेवर तरुणाई थिरकली

कोल्हापूर : दहीहंडीसाठी २० फूट उंचीचा उच्च न्यायालयाचा नियम, डॉल्बीच्या आवाजावर नियंत्रण अशा नियमांच्या बंधनातही गुरुवारी कोल्हापूरकरांनी अपूर्व जल्लोषात यंदाची दहीहंडी साजरी केली. दहीहंडीचा ‘थर’थराट जरी कमी असला तरी शिस्तीतही उत्सवाचा पूरेपूर आनंद घेण्याचा आदर्श कोल्हापूरकरांनी यावेळी घालून दिला. तासगाव येथील शिवगर्जना गोविंदा पथक, शिवाजी युवक मंडळ, शिरोळ गोडीविहीर, श्रीकृष्ण गोविंदा पथक, शिरढोण या मंडळांनी यंदा मोजक्याच दहीहंडी फोडल्या.शहरातील बहुतेक सर्व मोठ्या दहीहंडी आयोजक मंडळांनी नियमाला अधीन राहून दहीहंडी साजरी करण्याचा निश्चय गुरुवारी सकाळपासूनच केला होता. त्यामुळे गुजरी, शिवाजी चौक, आझाद गल्ली, गंगावेश, लक्ष्मीपुरी, बालगोपाल तालीम मंडळ, जयशिवराय तरुण मंडळ या ठिकाणी होणाऱ्या दहीहंडी उत्सवाची संबंधित आयोजकांकडून सकाळपासून तयारी सुरू होती. दरवर्षी शिरोळ येथील अनेक गोविंदा पथक मोठ्या संख्येने कोल्हापुरातील दहीहंडी फोडण्यासाठी येतात मात्र यंदा नियमाची अंमलबजावणी होणार म्हटल्यावर अनेक मंडळांनी न येणेच पसंत केले. दिवसभर पावसानेही विश्रांती घेतली होती. रात्री सातनंतर दोन बेस असलेली साऊंड सिस्टिम काही ठिकाणी दणाणू लागली. काही मंडळांनी जरी छोटी साऊंड सिस्टीम लावली असली तरी आवाजाची मर्यादा सांभाळली होती. रात्री आठनंतर तर अनेक छोट्या मंडळांच्या दहीहंडी फुटल्या होत्या. या आनंदाचा क्षण मोबाईलमध्ये टिपण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती. अनेकजण हे फोटो ‘व्हॉटस् अप’द्वारे शेअर करत होते.(पान ३ वर) ‘उंची कमी, पैसेही कमी’यंदा उच्च न्यायालयाने उंचीची मर्यादा घातल्याने मंडळाच्या बक्षिसावरही परिणाम झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. गेली काही वर्षे लाखोंची बक्षिसे लावणारी मंडळांनी यंदा १० ते २० हजार इतक्याच रकमेचा बक्षिसावर गोविंदा पथकांची बोळवण केल्याचे चित्र होते. अनेक मंडळांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.‘युवा शक्ती’च्या दहीहंडीची उणीवसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत ‘पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक बक्षिसांची दहीहंडी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या धनंजय महाडिक ‘युवा शक्ती’ची दहीहंडी यंदा प्रथमच रद्द करण्यात आली. या रद्द झालेल्या दहीहंडी कार्यक्रमाची चर्चा गुरुवारी अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. छोटी साऊंड सिस्टीम दणाणलीयंदा पोलिस प्रशासन व अन्य सामाजिक संघटनांच्या ‘नो डॉल्बी’च्या आवाहनाला अनेक मंडळांनी प्रतिसाद दिला. त्यात डॉल्बीऐवजी छोट्या साऊंड सिस्टीम लावून दहीहंडीचा आनंद द्विगुणित केला. यामध्ये दोन बेस व दोन टॉप काही ठिकाणी लावण्यात आले. त्यामध्ये ‘सैराट’,‘डिजेवाले बाबा जरा गाना लगा दे..’, आदी गाण्यांची धून सर्वत्र लावण्यात आली होती. आधीच थरांची मर्यादा, त्यात मोठ्या डॉल्बीवर बंदी आल्याने तरुणाईच्या उत्साहाला काही प्रमाणावर लगाम लागल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. न्यू गुजरी मित्रमंडळाची दहीहंडी गडहिंग्लजच्या संघर्ष गु्रपने फोडली. कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळाच्या दहीहंडीवर गोडीविहीरची मोहोर श्री पंत अमात्य बावडेकर आखाड्याची दहीहंडी फोडण्याचा मान श्रीकृष्ण गोविंदा पथकालाछत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळाची दहीहंडी तासगाव येथील ‘शिवाजी युवक मंडळा’ने फोडली. गंगावेशच्या दहीहंडीचा मान ‘शिरोळ’च्या अध्यक्ष ग्रुपला.