शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

‘रुईकर कॉलनी’मध्ये रंगलय हायटेक वॉर

By admin | Updated: October 26, 2015 00:31 IST

सोशल मीडियावर प्रचाराला वेग : नवोदित उमेदवारांमुळे प्रचारात उत्साह

कोल्हापूर : विकासकामांबाबत विविध बक्षिसे, पारितोषिक मिळविलेला आणि बहुतांश सुशिक्षित मतदार असणाऱ्या रुईकर कॉलनी प्रभागात चौरंगी लढत रंगणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांनी रिंगणात उतरविलेले उमेदवार हे पहिल्यांदाच निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे प्रचारात त्यांचा मोठा उत्साह दिसत आहे. उमेदवारांच्या गाठीभेटींसह सोशल मीडियावर प्रचार सुरू आहे.‘राष्ट्रवादी’चे विद्यमान नगरसेवक प्रकाश पाटील यांच्या पत्नी जयश्री या राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीच्या उमेदवार आहेत. हिंद महिला मंडळ, हिरकणी महिला बचतगटाद्वारे या प्रभागात कार्यरत असलेल्या जयश्री या पती प्रकाश यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. काँग्रेसकडून शैला चव्हाण लढत आहेत. प्रियदर्शनी महिला नागरी पतसंस्था, सीमंतिनी मराठा महिला मंडळ, सहेली मंचच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या चव्हाण या प्रभागातील मतदारांना परिवर्तनाची साद घालत आहेत. त्यांचे पती प्रदीप हे काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष आहेत. शिवनेरी फुटबॉल संघाचे अध्यक्ष असलेला त्यांचा मुलगा महेंद्र यांचा संपर्क हा शैला चव्हाण यांच्यासाठी अधिकचा मुद्दा ठरत आहे. भाजप-ताराराणी आघाडीकडून उमा इंगळे या रिंंगणात उतरल्या आहेत. भागीरथी महिला संस्थेद्वारे त्या प्रभागात कार्यरत आहेत. त्यांच्या प्रचारात आमदार अमल महाडिक यांनी ताकद लावली आहे. शिवाय विद्यमान नगरसेवक प्रकाश पाटील यांच्यावर नाराज असलेले हिंद को-आॅपरेटिव्ह हौसिंगमधील काही संचालक इंगळे यांच्या बाजूने उभारले आहेत. रमेश बुलबुले यांची सून जान्हवी या शिवसेनेकडून लढत आहेत. त्यांना आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे पाठबळ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. माधुरी पडवळे या अपक्ष म्हणून नशीब अजमावीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांचे कुटुंबीय, काही समर्थक हिंद को-आॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटीशी संबंधित आहेत. या सोसायटीतील अंतर्गत राजकारणाचा परिणाम या निवडणुकीत दिसून येणार आहे.अन्य प्रभागांप्रमाणे ‘रुईकर कॉलनी’मध्ये प्रचाराचा गोंगाट, दंगा दिसत नाही. पदयात्रा, ‘होम टू होम कॅम्पेन’ अशा पद्धतीने उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. वैयक्तिक गाठीभेटी आणि सोशल मीडियाद्वारे प्रचाराने या ठिकाणी वेग घेतला आहे. सुशिक्षित आणि युवा मतदारांचे प्रमाण जास्त असल्यामुळे सोशल मीडियातील प्रचार जास्त परिणामकारक ठरत आहे. याच्या माध्यमातून उमेदवारांकडून भूमिका मांडली जात आहेत.