शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रुईकर कॉलनी भाजी मार्केटची दुरवस्था

By admin | Updated: January 11, 2017 00:49 IST

महापालिकेचे दुर्लक्ष : लिशा हॉटेलजवळील विक्रेत्यांना मार्केटमध्ये हलविण्याची गरज

गौरव शिंदे --कदमवाडी --रुईकर कॉलनी येथील महानगरपालिकेच्या एलिगंट मार्केटची दुरवस्था झाली आहे. भाजी विक्रेते व ग्राहकांपासून मार्केट ओस पडले आहे. महापालिकेचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.रुईकर कॉलनी व परिसरातील नागरिकांना जवळच भाजीपाला मिळावा व भाजी विक्रेत्यांना आपला व्यवसाय करता यावा, यासाठी महानगरपालिकेच्यावतीने याठिकाणी मोठे भाजी मार्केट उभारण्यात आले; परंतु सध्या या मार्केटची दुरवस्था झाली असून, अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, मार्केटमध्ये प्रवेश करणेही कठीण झाले आहे. सभोवती झाडे-झुडपे, कचरा पसरला आहे.या मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. साधारणत: ५0 ते ६0 व्यावसायिक याठिकाणी आपला व्यवसाय करू शकतात, तसेच येथे ३0 गाळे आहेत, परंतु त्यातील बहुतांशी गाळे बंद अवस्थेत आहेत. या मार्केटमध्ये महानगरपालिकेकडून वेळच्या वेळी स्वच्छता होत नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच व्यावसायिक भाजी विकताना पाहायला मिळतात. या मार्केटमध्ये काही भाजी विक्रेत्यांनी सी.सी.टी.व्ही. बसविला होता; परंतु मध्यंतरी तो चोरीला गेल्यामुळे येथे सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. हे मार्केट रात्रीच्यावेळी मद्यपींचा अड्डा बनलेले असते. तसेच येथे मद्याच्या बाटल्यांचा ढीग पाहायला मिळतो.याठिकाणी दोन-चार भाजी विक्रेते आपला व्यवसाय करीत आहेत. येथे ग्राहकही जास्त प्रमाणात येत नसल्यामुळे भाजी विक्रेत्यांना व्यवसाय करणे अवघड झाले असल्याची प्रतिक्रिया भाजी व्यावसायिकांनी व्यक्त केली. या मार्केटची पालिकेने स्वच्छता करून लिशा हॉटेल परिसर, कदमवाडी व आजूबाजूला रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना एकत्र आणण्याची गरज आहे. या मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी फार कमी प्रमाणात ग्राहक येत असल्यामुळे व्यवसाय करणे कठीण बनले आहे. नाईलाजाने आम्ही येथे बसत आहोत.- बबन घोडके, भाजी विक्रेता.