शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात जाण्यासाठी आरटीपीआर प्रमाणपत्र बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:23 IST

कोगनोळी : कर्नाटकात प्रवेश करायचा असेल तर कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र किंवा कोरोना लसीचा एक डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात ...

कोगनोळी : कर्नाटकात प्रवेश करायचा असेल तर कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र किंवा कोरोना लसीचा एक डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले होते. परंतु शनिवार दिनांक ३१ पासून कर्नाटकात प्रवेशासाठीचे कोरोना लसीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल तरच राज्यात प्रवेश देण्यात येत आहे. यावरून कोरोनाच्या परिस्थितीनुसार कर्नाटक शासन निर्बंधांमध्ये बदल करत असल्याचे दिसून येत आहे.

आपल्या शेजारील राज्यातील कोरोनाचा संसर्ग आपल्या राज्यात होऊ नये यासाठी कर्नाटक शासन सुरुवातीपासूनच दक्ष असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे त्यांनी वारंवार परिस्थितीनुसार प्रवाशांवर निर्बंध लादले होते. कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र किंवा कोरोना लसीचा पहिला डोस असेल तरच राज्यात प्रवेश तसेच या दोन्ही गोष्टी नसतील तर राज्यातील प्रवेशास मज्जाव करण्यात येत होता. अति महत्त्वाचे कारण असल्यास कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी येथील तपासणी पथकाच्या ठिकाणी प्रवाशांची रॅपिड टेस्ट करण्यात येत होती. ती निगेटिव्ह आली तरच राज्यात प्रवेश देण्यात येत होता. या निर्बंधांमध्ये मंगळवार दिनांक ३१ पासून बदल करण्यात आले आहेत. यामध्ये फक्त कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल तरच राज्यात प्रवेश देण्यात येत आहे.

कर्नाटक शासनाने या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे वाहनधारकांची मात्र तारांबळ उडाली आहे. त्यामुळे कोगनोळी येथील तपासणी नाक्यावर जवळपास एक ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या ठिकाणी तहसीलदार डॉ. मोहन भस्मे, अन्न निरीक्षक आनंदा मडिवाळ, मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल कुंभार, कित्तूरचे उपनिरीक्षक देवराज उळागड्डी, हुक्केरीचे उपनिरीक्षक सिद्धरामप्पा हुन्नद आदींच्यासह अनेक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

कर्नाटक शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यात प्रवेश करण्यासाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. किमान एक डोस घेतल्याचे प्रमाणपत्र राज्यातील प्रवेशासाठी रद्द करण्यात आले आहे. प्रवाशांनी प्रशासनास सहकार्य करावे. डॉ. मोहन भस्मे तहसीलदार निपाणी

(छाया : बाबासो हळिज्वाळे)

फोटो ओळ :

कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्राशिवाय कर्नाटकातील प्रवेशास मज्जाव करण्यात आल्याने कोगनोळी येथील आंतरराज्य सीमेवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत व प्रमाणपत्र नसणाऱ्यांना परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे.