शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीओ’चे वीज कनेक्शन तोडले

By admin | Updated: March 18, 2015 00:05 IST

महावितरणची कारवाई : अंधारात सुरू झाला कारभार; ६१ हजार थकबाकी

कोल्हापूर : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) ६१ हजार ७८९ रुपयांची वीज थकबाकी राहिल्याने अखेर मंगळवारी महावितरणने वीजपुरवठा तोडला. दुपारी वीजपुरवठा बंद झाल्याने दिवसभर कार्यालय अंधारात राहिले. वीज बंदमुळे दैनंदिन कामकाजावर काही प्रमाणात परिणाम झाला. वीजपुरवठाच बंद असल्यामुळे आज, बुधवारीही कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.राज्य शासनाला बक्कळ महसूल मिळणारे कार्यालय म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालय. या कार्यालयाचे १ जानेवारी ते २८ फेबु्रवारी २०१५ या कालावधीत असलेले ६१ हजार ७८९ रुपयांचे वीज बिल थकीत होते. महावितरणने त्यासाठी आरटीओला या महिन्यात नोटीस दिली; पण नोटीस देऊन १५ दिवस उलटले तरी या कार्यालयाने थकीत बिल भरले नाही. त्यामुळे मंगळवारी महावितरणचे पथक आरटीओ कार्यालयात गेले. त्यांनी या कार्यालयातील वीजपुरवठा तोडला. त्यामुळे संपूर्ण कार्यालय अंधारात बुडाले. तास-दोन तास झाले तरीही वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. येथे कामासाठी आलेल्या नागरिकांना हा काय प्रकार आहे ते समजेना. दुपारनंतर कार्यालयातील नागरिकांची गर्दी कमी झाली. त्यानंतर कार्यालयातील युपीएस बॅकअपमधून काही काळ कामकाज सुरू राहिले. दोनवेळा नोटीस...जानेवारी महिन्याचे बिल थकीत होते. त्यामुळे आरटीओला फेब्रुवारीला नोटीस दिली. तेही बिल वेळेत भरले नाही. त्यामुळे मार्चमध्ये पुन्हा नोटीस दिली; तरीही बिल अदा केले नाही, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.महावितरणची थकबाकी अशी -ग्राहक बिल थकीत (कोटींमध्ये)१५ हजार १२६ (शहर)एक कोटी ११ लाख १८ हजार घरगुती, व्यावसायिक, औद्योगिकशेतीपंप - ३२८पाच कोटीएक लाख २६ हजार ९१५ (जिल्हा)दहा कोटी ४९ लाख १९ हजार घरगुती, व्यावसायिक, औद्योगिकशेतीपंप - ५६ हजार ४८८२९ कोटी सात लाख २७ हजार