शहरं
Join us  
Trending Stories
1
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
2
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
3
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे तुम्हाला माहितीये का?; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं, प्रकरण काय?
4
रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात
5
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
6
IND vs ENG 3rd Test: आयसीसीचा इंग्लंडला डबल दणका, लॉर्ड्स कसोटी जिंकूनही संघाचा मोठा तोटा! 
7
हॉट मॉडेल, राजघराण्याशी संबंध, रवी शास्त्रींसोबत दिसलेली ही महिला आहे तरी कोण?
8
निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला मिळाला नवा भिडू; एकनाथ शिंदेंनी भाजपाला शह देण्यासाठी आखली रणनीती?
9
८ वर्षांत पहिल्यांदाच GST मध्ये होणार बदल! PMO नं प्रस्तावाला दिली मंजुरी; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
10
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
11
महात्मा गांधींच्या ९४ वर्षे जुन्या चित्राला लिलावात मिळाले १.७ कोटी, जाणून घ्या त्यात काय खास आहे?
12
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
13
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
14
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
15
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारची 'मिर्झापूर' सिनेमात एन्ट्री, 'या' अभिनेत्याच्या जागी दिसणार
16
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
17
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
18
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
19
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
20
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!

‘स्वयंवरा’चा शाही सोहळा

By admin | Updated: January 29, 2015 23:42 IST

राज्य नाट्य स्पर्धा : ‘राधाकृष्ण’चे सादरीकरण--राज्य नाट्य स्पर्धा

सं. स्वयंवर हे महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत सादर झालेले दहावे नाटक. कै. कृष्णाजी खाडीलकर यांच्या लेखणीतून साकार झालेले हे नाटक रत्नागिरीच्या राधाकृष्ण कला मंचने सादर केले.नाथ हा माझा, सुजन कसा मन चोरी, रुपबली तो जा, भय न मम मना, यदुमनी सदना, मम मनी कृष्णसखा रमला, गुरु सुरस गोकुळी, नृपकन्या तव जाया, कांता मजसी तुची, रमणी मजसी नीजधाम अशा अवीट गोडीची गायनाला कठीण असलेली पदे या नाटकात आहेत. या गाण्याचे वेगवेगळे ताल व राग समजून घेऊन ती नाट्य संगीताच्या बाजात सादर करणे हे शिवधनुष्यच मानले जाते. या नाटकातील नाट्यपदे सादर करुन हे नाटक सादर करायला कोणीही धजावत नाही. परंतु रत्नागिरीच्या राधाकृष्ण कलामंचने शिवधनुष्य पेलले.प्रेरणा दामले (रुक्मिणी) यांनी गायनाबरोबरच अभिनयातही आपला ठसा उमटवला. नाटकातील गायकी अंगाची जवळजवळ १२ ते १३ गाणी सादर करुन प्रमुख भूमिका साकारण्यासाठी मोठे धैर्य लागते. शिवाय पौराणिक कथेतील भूमिका साकारताना देहबोलीवर विशिष्ट प्रकारचे नियंत्रण असावे लागते. या सर्वांचे भान ठेवून प्रेरणा दामले यांनी दर्जेदार रुक्मिणी साकारली.अनुप बापट (श्रीकृष्ण) यांनी संगीत नाटकात स्वयंवर या नाटकाद्वारे पदार्पण केल्याचे समजले. तरीही त्यांनी श्रीकृष्ण चांगला साकार केला. गायनावर विशेष मेहनत घेतल्याचे जाणवले. सुंदर मुखललना, कांता मजसी तूची, गुरु सुरस गोकुळी, सुधा दही दुधी यांसारखी पदे जी मोठ्या गायकांनी आधीच प्रसिद्ध करुन ठेवली आहेत ती पदे चांगली पेलली.संगीत दिग्दर्शक विलास हर्षे यांनी नाटकाला सुंदर संगीत दिग्दर्शन केले. नाट्यसंगीताचा डौल, बाज कायम ठेवून, स्वत:ची प्रतिभासुद्धा दाखवून दिली. उदय गोखले (व्हायोलिन), मिलिंद टिकेकर (तबला), मंदार जोशी (बासरी), विलास हर्षे (आॅर्गन) यांनी परस्पर समन्वयाने समर्पक अशी साथसंगत केली.नेपथ्य, पार्श्वसंगीत, वेशभूषा, रंगभूषा यावरही विशेष लक्ष दिले गेले. रुक्मिणीचे कोकीळेशी हितगूज, रुक्मिणीचे गाणे ऐकून जमा झालेल्या गायी, मंदार जोशींची घुमलेली बासरी खरंच लाजवाब.नाटकाची मूळ संहिता वाचल्यानंतर असे लक्षात येते की, सगळे नाटक सादर करण्यासाठी जवळजवळ पाच ते साडेपाच तास लागतात. परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता मूळ संहितेतील काही पदे, कथानकाचा काही भाग वगळण्यात आला. समीधा मुकादम (स्नेहलता), पूर्वा खालगावकर (महाराणी), किरण जोशी (शिशुपाल), विनित घाणेकर (रुक्मी), अभय मुळ्ये (भीष्म) व सहकालाकारांनी आपापली कामगिरी सुंदर पार पाडली. प्रत्येक कलाकाराने वैयक्तिक कामगिरी चांगली पार पाडल्यामुळे सांघिक परिणाम मिळाला. प्रेरणा दामले (रुक्मिणी) व अनुप बापट (कृष्ण यांना प्रत्येकी एकवेळा तांत्रिक अडथळा व रंगभूषेतील अडथळा आला. पण, तरीही त्यांनी प्रसंगावधान राखून वेळ मारुन नेण्याचे मोठे धैर्य दाखवले. एकंदरीत राधाकृष्ण कला मंचाच्या कलाकारांनी स्वयंवराचा सोहळा दिमाखात सादर केला.संध्या सुर्वे