शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांचा धुमाकूळ; मारहाणीत दोघे जखमी

By admin | Updated: October 28, 2014 00:20 IST

खटाव तालुक्यातील घटना : पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

वडूज : खटाव तालुक्यातील नडवळ, अंबवडे या दोन गावांतील तीन ठिकाणी काल, रविवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. धारदार शस्त्रांचा धाक दाखवून चोरट्यांनी सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांच्या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अंबवडे येथील आटोळी वस्तीवर राहणाऱ्या सुभाष साहेबराव पवार (वय ३९) यांच्या घरात रात्री पाऊणच्या सुमारास चोरट्यांनी कडी काढून प्रवेश केला. पवार, त्यांची पत्नी व तीन मुलींना जाग आली आणि त्यांनी आरडाओरडा केला. एका चोरट्याने माधुरी (१५) या मुलीच्या गालावर सँडल फेकून तिला जखमी केले, तर सुभाष पवार यांच्या बोटावर दुसऱ्याने धारदार शस्त्राने वार केला. चोरट्यांनी घरातील पेटीतील चाळीस हजारांची रोकड, दोन मोबाईल, घड्याळ असा ४२ हजार २०० रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. त्याच रात्री अंबवडे येथील चावडीशेजारी वास्तव्यास असणाऱ्या संजय नामदेव कोळी (दहातोंडे) यांच्या घरात दोन चोर मध्यरात्री घुसले व तीनशे रुपये रोख आणि मोबाईल चोरून नेला. घरातील लोक जागे झाल्याने चोरटे पळून गेले. रात्री पावणेदोनच्या सुमारास नढवळ येथील श्रीकांत जालिंदर झेंडे यांच्या घराची कडी कटावणीने उचकटून चोरट्यांनी साडेदहा हजारांची रोकड व एक लाख २० हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी मोबाईल आणि एटीएम कार्डही चोरून नेले. या चोऱ्यांबाबत वडूज पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल झाल्या असून, पोलीस निरीक्षक यू. एस. वाळके तपास करीत आहेत. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक डुंबरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तपासासाठी श्वानपथकास पाचारण केले.महिलांचा गोंधळया घटनांच्या तपासासाठी काही संशयितांना तालुक्याच्या विविध भागांतून पकडून आणण्यात आले होते; मात्र काही महिलांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करून गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांना काहीच हालचाल करता आली नाही.