शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

मराठा आरक्षण संघर्ष समितीतर्फे २५ जूनला मुंबईत गोलमेज परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:19 IST

कोल्हापूर : राज्य सरकारने आरक्षणप्रश्नी आणि विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. मराठा आरक्षण मिळविण्यासाठी आंदोलनाची दिशा ...

कोल्हापूर : राज्य सरकारने आरक्षणप्रश्नी आणि विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. मराठा आरक्षण मिळविण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्याबाबत दि. २५ जून (शुक्रवारी) रोजी मुंबईत राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद होणार आहे. मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा आरक्षण समन्वय समितीने ही परिषद आयोजित केली आहे. त्यात मराठा समाजातील विविध संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत संघर्ष समितीने यापूर्वी गोलमेज परिषद घेऊन आंदोलन केले. त्यावर राज्य सरकारने दि. ९ ऑक्टोबर २०२० रोजी शासन आदेश काढला. मात्र, त्यातील मराठा समाजाच्या मागण्यांबाबतच्या एकाही निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे पुन्हा आंदोलनाची दिशा गोलमेज परिषदेत ठरविण्यात येईल. या परिषदेचे ठिकाण, वेळ दि. १० जूनला जाहीर केली जाईल. आरक्षणाबाबत सुधारित याचिका दाखल करणे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी संस्थेसाठी प्रत्येकी दोन हजार कोटींची तरतूद करावी. ओबीसी प्रवर्गाप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क लागू करावे. आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या बांधवांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, आदी विविध १४ मागण्यांवर परिषदेत चर्चा केली जाणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले. या वेळी विजयसिंह महाडिक, भरत पाटील, भास्करराव जाधव, जयदीप शेळके, आदी उपस्थित होते.